Modi Government Sugar Export Ban | Sugar Industry Crisis Sarkarnama
देश

Sugar Export Ban : मोदी सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर बंदी : देशातील साखर उद्योगाला मोठा धक्का; भाव पडण्याचा धोका

Modi Government Sugar Export Ban : केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचं नोटीफिकेशन केंद्र सरकारने काढलं आहे. या नोटीफिकेशनमध्ये पूर्वी साखर निर्यातीवर मर्यादीत बंदी होती ती आता पूर्णपणे बंदी घातल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jagdish Patil

Modi Government Sugar Export Ban: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशातील नागरिकांना इंधन बचतीचं आणि पुढील एक वर्षभर सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांनी खाद्यतेलाचा वापर देखील काळजीपूर्वक करा, असंही सांगितलं होतं.

त्यानंतर सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या सोने चांदीवरील आयातशुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे केंद्राने आता साखरेच्या निर्यातीवर तातडीची बंदी घातली आहे.

३० सप्टेंबरपर्यंत देशातून होणाऱ्या साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचं नोटीफिकेशन केंद्र सरकारने काढलं आहे. या नोटीफिकेशनमध्ये पूर्वी साखर निर्यातीवर मर्यादीत बंदी होती ती आता पूर्णपणे बंदी घातल्याचं स्पष्ट केलं आहे.

तर साखर निर्यात रोखल्यामुळे देशांतर्गत किंमतीवर नियंत्रण येऊ शकतं. मात्र, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाचा फटका देशातील साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. शिवाय साखरेचा भाव पडण्याचा धोका देखील वर्तवला जात आहे.

दरम्यान, याआधाही सरकारकडून अनेकदा साखेरच्या निर्यातीवर बांधणं घालण्यात आली आहेत. साखर देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध झाली पाहिजे, तसंच साखरेची किंमत सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल एवढी राहिली पाहिजे, यासाठी देखील सरकार असं निर्णय घेतं.

त्यामुळे सध्याचं जगभरातील अस्थिरतेचं वातावरण बघता देशांतर्गत साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि साखरेची किंमत आटोक्यात रहावी यासाठी देखील सरकारकडून असा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT