Indian Air Force jets execute precision strikes on terror camps in Pakistan during Operation Sindoor, dismantling infrastructures linked to the 2008 Mumbai attacks.  Sarkarnama
देश

Operation Sindoor Impact : ती 9 ठिकाणेच का? हल्ल्यांशी काय होता संबंध? गुप्तचर यंत्रणांनी मोहिम फत्ते केली...

Targets: Terror Camps in Pakistan and PoK : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली.

Rajanand More

Connection to Mumbai Attacks: Kasab and Headley's Training Grounds : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय लष्कराने यापूर्वी काश्मीरसह मुंबई आणि इतर ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही बदला घेतला आहे. मध्यरात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील 9 दहशतवादी केंद्र उध्वस्त करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये भारताने फासावर लटकवेला दहशतवादी अजमल कसाबने ट्रेनिंग घेतलेल्या केंद्राचाही समावेश आहे.

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात आले. त्याची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली.

पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील केंद्र -

सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद – हा कॅम्प पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीपासून 30 किलोमीटर दूर आहे. येथे लष्कर ए तोयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, याचमहिन्यात गुलमर्ग आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांतील दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते.

सेदना बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचे हे केंद्र होते. हे शस्त्रास्त्रे, स्फोटके प्रशिक्षण आणि जंगलमध्ये राहण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र होते.

गुलपूर कॅम्प, कोटली – एलओसीपासून 30 किलोमीटर दूर होते. लष्कर ए तोयबाचा बेस होता. राजौरी आणि पूंछमध्ये सक्रीय होता. 20 एप्रिल 2023 मध्ये पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित करण्यात आले होते.

बरनाला कॅम्प, भीमबर – हा कॅम्प एलओसीपासून 9 किलोमीटर अंतरावर होता. हे शस्त्रात्रे हाताळणे आणि जंगलामध्ये अनेक दिवस राहण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र होते.

अब्बास कॅम्प, कोटली – एलओसीपासून हा कॅम्प 13 किलोमीटर दूर आहे. लष्कर ए तोयबाची दहशतवाद्यांची ही फॅक्टरी होती. एकावेळी 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची या केंद्राची क्षमता होती.

पाकिस्तानातील केंद्र -

सरजल कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटर दूर आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या चार जवानांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षित करण्यात आले होते.

मेहमूना जोया कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमेपासून हा कॅम्प 12 ते 18 किलोमीटर परिसरात होता. हा कॅम्प हिज्बूल मुझाहिद्दीनचा कॅम्प होता. कठवा, जम्मूमध्ये दहशत निर्माण करण्याचे हे प्रमुख केंद्र होते. पठाणकोट एअर कॅम्पवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे प्लॅनिंग आणि नियंत्रण मेहमूना कॅम्पमधून करण्यात आले होते.

मरकज तैयबा मुरीदके कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 18 ते 25 किलोमीटर दूर असून 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीनेही इथेच प्रशिक्षण घेतले होते.

मरकज सुभानअल्ला भावलपूर कॅम्प – हा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. याठिकाणी भरती आणि प्रशिक्षण दिले जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT