Omar abdullah, Raj Kumar Thapa Sarkarnama
देश

India vs Pakistan : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्याच्या घरावर पाकिस्तानने डागला तोफगोळा, राजकुमार थापा यांच्यासह दोघांचा मृत्यू

Raj Kumar Thapa Death : पाकिस्तानने राजौरी येथे डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

Jagdish Patil

Jammu Kashmir news, 10 May : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र, पाकिस्तानकडून काही नागरी वस्त्यांमध्ये देखील अंधाधुंद गोळीबार केला जात आहे.

अशातच आता पाकिस्तानने राजौरी येथे डागलेल्या तोफगोळ्याच्या स्फोटात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

राज कुमार थापा असं मृत्यु झालेल्या अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचं नाव आहे. थापा हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घराच्या परिसरात पाकिस्तानने तोफगोळा डागला.

या स्फोटात थापा गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, थापा यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, राजौरीमधून अत्यंत वाईट बातमी आली आहे.

जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतील एक चांगला अधिकारी आपण गमावला आहे. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांबरोबर काल दिवसभर उपस्थित होते. पण आज त्यांचं निवासस्थान पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं. ज्यामध्ये थापा यांचा मृत्यू झाला. माझ्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.", अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT