India-Pakistan War : शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तान-भारतामध्ये काय घडले? पाच मोठ्या घडामोडी जाणून घ्या

India Vs Pakistan Narendra Modi Indian Army : पाकिस्ताने शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीच्या दिशेने त्यांचे फतेह 1 हे मिसाईल डागले. हे मिसाईल भारतीय लष्कराने हवेतच नष्ट केले.
Tensions rise as five major India-Pakistan developments unfold at midnight on May 9, reshaping the region’s security and diplomacy.
Tensions rise as five major India-Pakistan developments unfold at midnight on May 9, reshaping the region’s security and diplomacy.Sarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor 2 : भारत पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले शुक्रवारी रात्री करण्यात आले. शुक्रवारची रात्री दोन्ही देशांच्या दृष्टिने महत्त्वाची ठरली.हल्ले आणि प्रतिहल्ले सुरुच होते. शुक्रवारी रात्री घडलेल्या पाच मोठ्या घडामोडी जाणून घेऊयात

पाकिस्तानच्या एअरबसवर हल्ला

रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद एयरबेसवर मध्यरात्री ड्रोनचा जोरदार हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेत हा हल्ला भारताने केल्याचे म्हटले. भारताच्या हल्ल्याने भेदरलल्या पाकिस्ताने अनेक शहरात ब्लॅक आऊट केले. पाकिस्तान लष्कराने दावा केला की भारताने नूर खान, मुरिद आणि रफीकी या त्यांच्या तीन हवाईतळांवर मेसाईलने हल्ला केला.

Tensions rise as five major India-Pakistan developments unfold at midnight on May 9, reshaping the region’s security and diplomacy.
Earthquake in Pakistan : पाकवर दुहेरी संकट ओढावलं; भारताकडून हवाई हल्ले सुरू असतानाच पाकिस्तान भूकंपाने हादरलं

पाकिस्ताने दिल्लीवर मिसाईल डागले

पाकिस्ताने शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीच्या दिशेने त्यांचे फतेह 1 हे मिसाईल डागले. हे मिसाईल भारतीय लष्कराने हवेतच नष्ट करत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानचे महत्त्वाच्या मिसाईल पैकी एक असणाऱ्या फतेह 1 ला भारताने नष्ट केल्याची भारतीय लष्कराची कामगिरीने पाकिस्तानला धक्का बसला.

पाकिस्तानकडून नागरीवस्त्या टार्गेट

पाकिस्तानकडून सीमावर्ती भागातील नागरीवस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 26 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी ड्रोनचा वापर केला. पंजाबमधील जालंधर, जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे नागरीवस्तीमधील घरांचे तसेच गाड्यांचे नुकसान झाले. भारताने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री तिम्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. ही बैठक अडीच तास चालली. या बैठकीमध्ये सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेतण्यात आला. तसेच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती आहे.

दहशतवादी तळ उद्ध्वस्त

पाकिस्तान व्याप्त जम्मू परिसरातील दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कराने या संदर्भातील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जम्मूजवळील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड देखील ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आल्या.

Tensions rise as five major India-Pakistan developments unfold at midnight on May 9, reshaping the region’s security and diplomacy.
India-Pakistan War : मोठी बातमी! पाकिस्तानकडून दिल्लीवर हल्ला, मिसाईल डागले पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com