India’s Response to Pahalgam Terror Attack Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू..., वेळ अन् ठिकाण तुम्हीच निवडा, PM मोदींचा तिन्ही सैन्य दलांना 'फ्री हॅन्ड'

India’s Response to Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांसह त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. जनभावना लक्षात घेत भारत सरकारने देखील पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करायला सुरूवात केली आहे.

Jagdish Patil

New Delhi News, 30 Apr : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांसह त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे.

जनभावना लक्षात घेत भारत सरकारने देखील पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करायला सुरूवात केली आहे. अशातच मंगळवारी (ता.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांना दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी काही कारवाई करायची असेल त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आणि मोकळीक असेल, अशी ग्वाही दिली आहे.

तसंच प्रत्युत्तराची कारवाई काय असेल, ती कधी केली जाईल आणि लक्ष्य काय असेल हे सैन्य दल ठरवू शकतात, अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यामुळे आता भारतीय लष्कर पाक विरोधात काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकविरोधात कठोर भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. मागील अनुभव पाहता मोदी सरकार दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी प्लॅन करत असल्याचं बोललं जात होतं. अशातच काल पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली.

या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, वायूसेना प्रमुख अमरप्रीत सिंग, नौदल प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी उपस्थित होते.

या बैठकीत संभाव्य कारवाईबाबतची रणनिती काय असेल याबाबतची चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबतची सुत्रांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प असल्याचा पुनरुच्चार केला.

तर यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांना पुढील पूर्णपणे मोकळीक असल्याचे स्पष्ट केले. तसंच सैन्य दलाच्या शक्तीवर देशाचा पूर्णपणे विश्वास असून त्यांना वाटेल तो योग्य निर्णय घ्यावा. सरकार पूर्णपणे सैन्य दलांची पाठीशी असेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी या बैठकीत दिली. त्यामुळे आता भारतीय लष्कर पाकिस्तान विरोधात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT