Modi government under pressure : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानस्थित दहशतवादी अड्डे लक्ष्य करताना, 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत उद्ध्वस्त केले.
केंद्रातील मोदी सरकारमधील भाजप खासदारांकडून 'ऑपरेशन सिंदूर' 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करताच, काँग्रेस, आम आदमी पक्षासह विरोधकांनी पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी कोठे आहेत? ते सापडलेले आहेत की नाही? 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्याचा मग दावा करायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे.
भाजप (BJP) खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्र यांनी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्याचा दावा केला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे कोणताही दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता प्रहार केला जाईल, अशा शब्दांत इशारा दिला. मात्र काँग्रेस, आम आदमी पक्षासह विरोधकांनी पंतप्रधानांना, सत्तेतील भाजपला प्रश्न विचारत त्यावर निवेदन करावं, अशी मागणी केली आहे.
'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्याचा सत्ताधारी भाजपचा दावा आहे. तर मग पहलगाम इथं दहशतवादी हल्ला करणार चार दहशतवादी कोठे आहेत? असा सवाल काँग्रेसने (Congress) केला आहे. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेला मध्यस्थी का करू दिली, असा प्रश्न शरद पवार यांनी केला आहे. भाकपने देखील याच मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निवेदनाची मागणी केली आहे.
आपचे खासदार संजय सिंह यांनी तर सत्ताधारी मोदी सरकारला अनेक प्रश्न केले आहेत. त्यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी कुठे गेले? आपलं सैन्य पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळू शकत असताना, अमेरिकेचे एकून शस्त्रविराम का केला? डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे मोदीही पाकिस्तानला महान आणि शक्तिशाली मानतात का? काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे का? असे प्रश्न केले आहेत.
काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारतातील मोदी सरकारला ही मध्यस्थी मान्य आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयश ठरले आहे. अमेरिकेने भारताचा अपमान केला आहे. या सगळ्यांची केंद्र सरकारने उत्तर द्यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर संसदेची विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या हस्तक्षेपावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली. सिमला करारानुसार भारत-पाकिस्तानदरम्यान तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकरण्यात आली असतानाच, आपण तिसऱ्या देशाला जागा कशी काय देऊ शकतो, असा प्रश्न शरद पवार यांनी केला आहे. या सर्व मुद्यांवर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी शरद पवार यांनी केली. काही बाबी गोपनीय ठेवाव्या लागतात, त्यामुळे सर्व पक्षीय बैठकच यावर चर्चेसाठी योग्य राहिल, असेही शरद पवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.