PM Narendra Modi with Gamers Sarkarnama
देश

India Politics 2024 : भारतीय राजकारणातील ‘Noob’ कोण? उत्तर देताना मोदींनाही हसू आवरेना

PM Narendra Modi News : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील सात टॉप गेमर्ससोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्याचा व्हिडिओ आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये मोदींनी गेमिंगसह विविध मुद्द्यांवर संवाद साधला होता.

Rajanand More

New Delhi News : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (India Politics 2024) धुरळा उडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील टॉप गेमर्ससोबतचा व्हिडिओ आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी त्यांच्याशी गप्पा मारतानाच विरोधकांचीही फिरकी घेतली आहे. या गप्पांमध्ये नूब (Noob) हा शब्द आला अन् पंतप्रधानांना राजकारणाची आठवण झाली. आज हा शब्द सोशल मीडियात ट्रेंडिगमध्ये असून, भाजपच्या अनेक नेत्यांनी या गप्पांचा व्हिडिओ व्हायरल करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नूब म्हणजे काय?

नूब म्हणजे नवशिका. म्हणजे एखाद्या विशिष्ट खेळामध्ये किंवा कामामध्ये कुशल नसलेल्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो. गेमिंग क्षेत्रात हा शब्द लोकप्रिय आहे. सात गेमर्सशी गप्पा मारत असताना या शब्दावरून चर्चा झाली. मोदींनी (PM Narendra Modi) गेमर्सकडून काही गेम्स खेळण्याचेही धडे घेतले. या चर्चा सुरू असतानाच त्या राजकारणाकडे (Politics) वळल्याचे दिसते.

काय म्हणाले पंतप्रधान?

गेमर्ससोबत गप्पा मारत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी प्रचार सभेमध्ये नूब हा शब्द वापरला तर तुम्ही विचार कराल ना की मी कुणासाठी बोलत आहे...मी बोललो तर तुम्ही विचार करा की एका विशिष्ट व्यक्तीविषयी बोलत आहे...’ यानंतर पंतप्रधान मोदींसह सातही जणांमध्ये हशा पिकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपच्या (BJP)अनेक नेत्यांना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व अभिनेत्री कंगना रनौतनेही एक्स हँडलवर व्हिडिओ पोस्ट करत हा नूब कोण आहे?, असा प्रश्न केला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही व्हिडिओ ट्विट करत थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. तरीही काँग्रेसचे नेते प्रतिक्रिया देत राजकारणातील नूब कोण आहे, यावर शिक्कामोर्तब करत आहेत, असा टोला पूनावाला यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदींनी ज्या सात गेमर्ससोबत संवाद साधला त्यामध्ये नमन माथूर, अनिमेष अग्रवाल, अंशू बिशू, गणेश गंगाधर, तीर्थ मेहता, पायल धारे आणि मिथिलेश पाटणकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत गेमिंग उद्योगाला चालना देण्यासाठीचे प्रयत्न, अडचणी, त्याचे दुष्परिणाम यावरही चर्चा केली.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT