India’s Stern Warning to Pakistan Over Terrorism : पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे कोणत्याही प्रकारचं दहशतवादी कृत्य हे युद्ध मानलं जाईल, असा कडक इशारा भारताने पाकिस्तानला दिलेला आहे. यामुळे आधीच भेदरलेल्या पाकिस्तानच्या उरात धडकी भरली आहे.
भारताने निर्णय घेतला आहे की, ''भविष्यात घडणारे कोणत्या प्रकारचे दहशतवादी कृत्य हे भारताविरुद्ध युद्ध मानली जाईल आणि त्यानुसारच त्यावर प्रत्युत्तर दिले जाईल.'' मागील दोन दिवासांपासून पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर विविध प्रकारे हल्ले सुरू आहेत, ज्याला भारताने जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची नाचक्की झालेली आहे. संपूर्ण जगभरातून केवळ एक दोन देश सोडले तर पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. आधीच कंगाल असणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेकडूनही दणका मिळालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सर्वबाजूंनी भारताने एकप्रकारे कोंडी केली आहे.
अशात आता पाकिस्तानचा सुरू काहीसा नरमायला लागल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, ' आम्हाला शांतता हवी आहे. भारताने त्यांच्या आक्रमकतेला आवार घालायला हवा. भारत थांबला तर आम्हीही थांबू. आम्ही युद्धाचे समर्थक नाही. संपत्तीचे आणि आर्थिक नुकसान आम्हाल नकोय. अशा परिस्थितीत जर भारत थांबला तर परिस्थिती ठीक होऊ शकते कारण मग पाकिस्तानकडूनही हल्ला केला जाणार नाही.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.