Pakistan Defence Minister : पाकिस्तानी संरक्षणमंत्री पुन्हा बरळले; म्हणाले, ''आम्ही तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला, आता..''

Pakistan Defence Minister Khawaja Asif : या आधी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी असाही दावा केला होता की, ''पाकिस्तानी सैन्याने जाणुनबुजून भारताचे ड्रोन रोखले नव्हते. कारण...''
Pakistan Defence Minister Khawaja Asif addresses media, stating that war with India appears to be the only option left, heightening regional tensions
Pakistan Defence Minister Khawaja Asif addresses media, stating that war with India appears to be the only option left, heightening regional tensionssarkarnama
Published on
Updated on

Khawaja Asif’s Shocking War Statement Against India :  भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सातत्याने हल्ले सुरू असल्याने युद्धजन्य परिस्थिती आहे. अशावेळी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक अतिशय बेजबाबदारपणाचे आणि भडकाऊ असे विधान समोर आले आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका पाकिस्तानी मीडियाशी बोलताना म्हटले आहे की, आमच्याकडे आता युद्धाशिवाय पर्याय नाही. मागील चार दिवसांपासून भारताकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवाईमुळे आम्हाला या(युद्ध) पर्यायाशिवाय अन्य कोणताही मार्ग दिसत नाही. आम्ही तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु असं होण्याची शक्यता फार कमी आहे. आम्हाला त्यांना अशाचप्रकारे उत्तर द्यावे लागेल.

Pakistan Defence Minister Khawaja Asif addresses media, stating that war with India appears to be the only option left, heightening regional tensions
World Bank : ...आता जागतिक बँकेकडूनही पाकिस्तानला मोठा दणका!

एवढचं नाहीतर ख्वाजा आसिफ यांनी पुढे म्हटले की, लोकांच्या मनात आता कुठल्याही प्रकारची शंका नसावी की ते युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र यावेळी त्यांनी हे नाही सांगितले, की पाकिस्तानी सैन्य आपली मोहीम कशी सुरू करेल.

Pakistan Defence Minister Khawaja Asif addresses media, stating that war with India appears to be the only option left, heightening regional tensions
Home Ministry alert : पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थिती अन् केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवले महत्वाचे पत्र!

विशेष म्हणजे याच्या आधी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी असा दावा केला होता की, पाकिस्तानी सैन्याने जाणुनबुजून भारताचे ड्रोन रोखले नव्हते. कारण, त्यांच्या प्रत्युत्तरामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानी पोस्ट कुठे कुठे आहेत, हे समजेल. त्यांच्या या अजब वक्तव्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com