Prime Minister Narendra Modi meets Jammu & Kashmir Chief Minister Omar Abdullah in New Delhi to discuss the aftermath of the Pahalgam terror attack and review national security strategies. Sarkarnama
देश

Omar Abdullah Meets PM Modi : भारत पाकविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट, नेमकी चर्चा काय?

Omar Abdullah Meets PM Modi : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही दोन्ही नेत्यांमधील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Jagdish Patil

Navi Delhi News, 04 May : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही दोन्ही नेत्यांमधील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जवळपास अर्धातास झालेल्या या बैठकीत पहलगाम येथील हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेसंदर्भातील परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सच्या सूत्रांनी महत्वाची माहिती दिली.

त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्याला जम्मू काश्मीर प्रशासनाच्या वतीनं पूर्ण सरकार्य करण्याची भूमिका ओमर अब्दुला यांची असून देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत ते राहणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले असून कोणत्याही क्षणी दोन्हीकडून मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.

असं असतानाच दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी घेतलीली बैठक महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे.

पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाकिस्तानकडून हवाई किंवा अन्य मार्गाने होणारी टपालसेवा देखील बंद केली गेली आहे. तसंच पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT