Indian Air Force releases official notification for Agniveer Vayu recruitment, inviting applications from eligible candidates nationwide.  sarkarnama
देश

Agniveer Vayu Bharti 2025 : भारतीय हवाई दलात ‘अग्निवीर वायू’ भरती; अधिसूचना जाहीर!

Agniveer Vayu Recruitment - जाणून घ्या, कोण असणार पात्र अन् काय आहे वयोमर्यादेची, शिक्षणाची अट आदी सर्व काही

Mayur Ratnaparkhe

Indian Air Force invites applications for Agniveer Vayu recruitment - भारतीय वायू दलात(एअर फोर्स) सामील होण्याचं अनेक देशभरातील लाखो तरुणांचं स्वप्न असतं. भारताच्या वायू दलाबाबत तरुणांमध्ये प्रचंड वेडही दिसते, त्याचे आकर्षणही आहे. परंतु, सगळ्यांनाच वायू दलात जाता येतं असं नाही, यासाठी प्रवेश परीक्षेचा कठीण मार्ग पार करावा लागतो. यासाठी वर्षानुवर्षे अभ्यासही केला जातो आणि कधी एकदा इंडियन एअर फोर्समधील भरतीच जाहीरात निघते, याची सर्वांना प्रतीक्षा असते.

आता अशीच संधी भारतीय वायू सेनेने नवीन भरतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. भारतीय वायुदलाने अग्निवीर वायू INTAKE 02/2026 भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  या नवीन भरतीसाठी अर्ज ११ जुलै २०२५ रोजी हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू होतील. तर शेवटची तारीख ही ३१ जुलै आहे, तोपर्यंत तुम्ही आपला अर्ज दाखल करू शकतात. आता या नवीन भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी कोणत्या अटी आणि नियम आहेत, ते पाहूयात. उंची, वयोमर्याद आदींबाबत तपशील जाणून घेऊयात.

अग्निवीर वायु भरतीसाठी फॉर्म विज्ञान आणि कला दोन्ही विषयांतून बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. विज्ञान शाखेतून अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे गणित/भौतिकशास्त्र/आणि इंग्रजी या विषयांसह ५० टक्के गुणांसह इंटरमिजिएट/१०+२/समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय इंग्रजी विषयातही ५० टक्के गुणे असणे आवश्यक आहे.

याचबरोबर मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. याशिवाय कला शाखेतील उमेदवारांना देखील किमान ५० टक्के गुण असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, वयोमर्यादा आणि उंचीशी संबंधित पात्रता देखील आवश्यक आहेत.

वयोमर्यादा-

वायुसेनेमध्ये अग्निवीर वायू म्हणून भरती होणाऱ्या उमेदवारांचे वय १७.५ वर्षे ते कमाल २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार, उमेदवारांची जन्मतारीख २ जुलै २००५ ते ०२ जानेवारी २००९ दरम्यान असावी.

उंची –

पुरुष व महिला उमेदवारांची उंची किमान १५२ सेमी असावी. तथापि, काही प्रकरणांमध्ये उमेदवारांना यामध्ये सूट देखील देण्यात आली आहे. शिवाय, उमेदवारांचे वजन हे उंचीनुसार असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादी टप्प्यांद्वारे केली जाईल.

वेतन –

अग्निवीर वायू मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना अग्निपथ योजनेनुसार दरमहा ३० हजार रुपये वेतन मिळेल. याशिवाय इतर भत्तेही दिले जाणार आहेत. तसेच वर्षानुवर्षे यामध्ये वाढही होणार आहे.

भारतीय हवाई दल अग्नवीर वायू भरती २०२५ अधिसचून पीडीएफ - https://agnipathvayu.cdac.in/AV/img/upcoming/AGNIVEER_VAYU_02-2026.pdf

ऑनलाइन परीक्षेची तारीख  - अग्नवीर वायूची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होवू शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT