Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी(ता.11 नोव्हेंबर) दुपारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) नाक्यावर हल्ला केला होता. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा जवानांवर अंदाधुंद गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते,तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी जवानांना उपचारासाठी अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आता या कुलगामच्या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत आता भारतीय लष्करानं लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर आणि कुलगाम हल्ल्यामागचा मास्टरमाईंड असलेल्या लतीफ भटचा एन्काऊंटर करण्यात आल्याचं समोर येत आहे. त्यासोबत आणखी एक दहशतवादीही मारला गेला आहे.
भारतीय लष्करासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी असलेला लतीफ भट हा मूळचा कुलगामचा रहिवासी आहे. तपासयंत्रणांना भट हा पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत काम करत असल्याचा संशय होता. त्याने दक्षिण काश्मीरमधील विविध ठिकाणी लपण्यासाठी ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या नेटवर्कची मदत घेतल्याचीही माहिती समोर येत आहे.
लतीफ भट याच्यावर यावर्षी झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला जातो. अनंतनागच्या लाल चौक परिसरात 22 जुलै रोजी पोलिस कॉन्स्टेबलची हत्या तसेच कुलगाम येथील स्थलांतरित मजुरांची 31 जुलै रोजी झालेली हत्या यांसारख्या अलिकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांचा समावेश आहे.
कुलगाम येथील झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. पूर्ण ताकद लावताना लष्कराच्या जवळच्या सर्व तुकड्या तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपचे जवान या चकमकीत सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे.
कुलगाम येथील मीर बाजारजवळ असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर 11 नोव्हेंबर रोजी दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर होती. या हल्ल्यानंतर दोन्ही दहशतवादी जवळच्या जंगल परिसरात फरार झाले होते.
कुलगाममधील हल्ल्यानंतर 24 तासांहून कमी कालावधीत पुन्हा किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन विशेष पोलीस अधिकारी यांची निर्घृणपणे हत्या केली होती. यात मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे बाबी चंद आणि यशपाल कुमार आहेत. हे दोन्ही अधिकारी दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान लष्करासोबत सहभागी होण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.