Raju Shetti : सोलापूरचे कारखानदार शेतकऱ्यांना 900-1200 दर कमी देतात; हा अन्याय का.? : राजू शेट्टी कडाडले

SugarCane FRP News : सोलापूर जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत ऊसाला कमी दर मिळत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांनी उसाचा बुडका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 16 November : सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांत 3400 पासून 4200 रुपये प्रतिटन उसाला भाव जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार हे 900 ते 1200 रुपये कमी दर देतात. रिकव्हरी आणि ऊस चांगला असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का..? हाच सवाल विचारण्यासाठी आम्ही आज (ता. 16 नोव्हेंबर) हातात उसाचा बुडका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यापूर्वी माजी खासदार शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली.

सरकार कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळतं, प्रशासन काय भूमिका घेतं आणि कारखानदार काय भूमिका घेतात, यावर आमच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरणार आहे. जर शेतकऱ्यांना गृहीत धरलं आणि बेदखल केलं तर सगळ्यांनाच महागात पडेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

सोलापूर जिल्ह्यात जे साखर कारखाने चालवत आहेत, ते चुकीच्या पद्धतीने चालवत आहेत. आज मार्केटमध्ये साखरेचा भाव हा 5300 रुपयांपर्यंत आहे. मात्र, येथील काही कारखानदार हे 4300 रुपयांना साखर विकत आहेत, असा आरोपही माजी खासदार शेट्टी यांनी केला.

Raju Shetti
Karad Politic's : कराडला लागणार सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी? : आमदार भोसले अन्‌ उंडाळकरांची नावे चर्चेत

ते म्हणाले, शेतकऱ्यांना कमी पैसे देऊन कमी पैशात ऊस खरेदी केला जातोय आणि त्यामुळे कमी पैशात साखर विकून ते सर्व उद्योगाचं नुकसान करत आहेत..

Raju Shetti
Satara Dcc Bank Chairman : सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत गोरेंनी पुन्हा ठणकावलं; म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नीट अन्‌ क्लिअर ठरलंय...

आज केंद्रीय सहकार मंत्री पुण्यात आहेत. मागील तीन महिन्यांपासून मी एक प्रश्न विचारतोय, त्याच त्यांना उत्तर द्यावं लागेल. या देशात मागील वर्षी जे साखरेचा उत्पादन झाले, त्यातील 30 लाख टन साखरेचा हिशेब लागत नाही. ही साखर कुठे गेली..? या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावं लागेल, अशीही मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.