Gurudwara Committee News : Sarkarnama
देश

Gurudwara Committee News : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांचा खलिस्तानवाद्यांकडून अपमान; गुरुद्वारा कमेटीने घेतला समाचार...

Glasgow Gurudwara Committee : ग्लासगो गुरुद्वारातील गुरू ग्रंथ साहेब शीख समाजाकडून एक पत्र जारी...

Chetan Zadpe

New Delhi News : भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराई स्वामी हे ब्रिटनमधील ग्लासगो गुरुद्वाराला भेट देण्यासाठी गेले होते. या वेळी काही खलिस्तानी समर्थकांनी गुरुद्वाराबाहेर त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. गुरुद्वाराबाहेर घडलेल्या या प्रकाराबाबत ग्लासगो गुरुद्वारा कमिटीने नाराजी व्यक्त करीत खलिस्तानी समर्थकांना चांगलेच सुनावले आहे. (Latest Marathi News)

भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराई स्वामी यांच्या अपमानाने नाराज झालेल्या गुरुद्वार कमिटीने या संदर्भात एक पत्र जारी केले असून, शीख समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या ग्लासगो गुरुद्वाराच्या बाहेर अशा स्वरूपाचा प्रकार घडणे हे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच त्यांच्या या भेटीच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ग्लासगो गुरुद्वारातील गुरू ग्रंथ साहेब शीख समाजाकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, "२९ सप्टेंबरला भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराई स्वामी एका खासगी दौऱ्यानिमित्त या ठिकाणी आले होते. त्यानंतर ग्लासगो गुरुद्वाराच्या बाहेर ही घटना घडली आहे. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही नागरिकांकडून या ठिकाणी अशांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असून, या घटनेची ग्लासगो गुरुद्वारातील शीख समुदायाचा कसलाच संबंध नसल्याचेही त्यात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गुरुद्वारात पोहोचल्यानंतर दोराई स्वामी यांना काही खलिस्तानी समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. ते गुरुद्वारा समितीच्या विश्वस्तांशी चर्चा करण्यासाठी आले होते. यामुळे भारतने ब्रिटन पुढे हा मुद्दा उचलून धरला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT