Indian Womens Wealth .jpg Sarkarnama
देश

Indian Womens News: देशातील महिलांचं नशीब पालटणार, 'अच्छे दिन' येणार, तब्बल 73 लाख कोटींच्या मालक बनणार...; अहवालातून मोठी अपडेट समोर

Indian Women Wealth: केंद्र असो किंवा राज्य सरकार विविध योजनांमधून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. मोठमोठ्या शहरांपासून ते अगदी गावपातळीवरील महिलांनाही अधिकाधिक स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: केंद्र असो किंवा राज्य सरकार विविध योजनांमधून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. मोठमोठ्या शहरांपासून ते अगदी गावपातळीवरील महिलांनाही अधिकाधिक स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे. मात्र,आता महिलांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

भारतीय कुटुंबांमधील महिला पुढील 10 वर्षांत किमान 73 लाख कोटी रुपयांच्या मालक बनणार असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. भारतीय महिलांना वारसा हक्काने मिळालेल्या संपत्ती मिळणार असल्याचा दावा बार्कलेज प्रायव्हेट बँकेच्या नव्या अहवालामधून करण्यात आला आहे.

कुटुंबांमध्ये महिलांना पुढील 10 वर्षांत कमीतकमी 73 लाख कोटी रुपयांची संपत्ती वारसाने मिळण्याची शक्यता आहे. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे होत असलेल्या संपत्तीच्या या हस्तांतरणामुळे केवळ संपत्तीची मालकीच बदलणार नसून तिची गुंतवणूक, व्यवस्थापनातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच संपत्ती पुढील पिढ्यांकडे हस्तांतरण करण्याची पद्धतही बदलू शकते असं मत व्यक्त 'बार्कलेज प्रायव्हेट बँके'च्या नव्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपल्या देशातील महिला ह्या पुढील काळात संपत्ती हस्तांतरणाच्या संपूर्ण प्रक्रियेत केवळ एक महिला म्हणून बाजूला उपस्थित असणारी व्यक्ती राहणार नाही. तर संपत्तीशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी येऊ शकतात. ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरुही झाल्याचं दिसून आलं आहे.

बार्कलेज प्रायव्हेट बँकेच्या अहवालामधून महिला या केवळ वारसा हक्काने मिळालेली संपत्ती स्वीकारत नसून त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, यामध्येही त्या अधिकाधिक सक्रिय भूमिका बजावत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तसेच भारतीय महिलांमध्ये संपत्तीच्या उत्तराधिकार नियोजनाबाबत चांगल्याप्रकारे जागरूकता वाढताना दिसून येत आहे. मात्र, या जागरूकतेचे औपचारिक आणि व्यवस्थित नियोजनात रूपांतर होणे हे ग्रामीण पातळीवरील महिलांसमोरचं मोठं आव्हान असल्याचंही मत व्यक्त करण्यात आलं आहे.

भारतात अनेक पिढ्यांपासून एका पिढीने संपत्ती निर्माण केली, दुसऱ्या पिढीने तिचे व्यवस्थापन केले आणि त्यानंतर ती कुटुंबातील पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात येते. या संपत्तीत पैसे, सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, वास्तू, जमीन,शेअर्स, व्यवसाय यांसारख्या बाबींचा समावेश असतो.

बार्कलेज प्रायव्हेट बँक आणि एन्क्यूबे यांच्याकडून ओनरशिप शिफ्ट: पर्स्पेक्टिव्हज फ्रॉम वुमन पायोनियर्स लीडिंग इंडियाज इंटरजनरेशनल वेल्थ ट्रान्सफर’ या नावानं हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात 22 महिला उद्योजक, गुंतवणूकदार, फंड मॅनेजर आणि कौटुंबिक संपत्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या महिलांच्या अनुभवांचा समावेश करण्यात आला आहे.

कौटुंबिक संपत्तीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत महिला पुढील काळात पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे पावले टाकण्याची शक्यता आहे. तसेच सुमारे 40 टक्के महिलांनी पुढील तीन ते पाच वर्षांत नवीन भांडवलाची गुंतवणूक करताना प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटल आणि स्टार्टअप्समधील गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र, सध्या केवळ 13 टक्के महिला या प्रकारच्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT