Election Commission News|
Election Commission News|  Sarkarnama
देश

EC Discontinued Election Indelible Ink : मतदानानंतर बोटांवरील शाई कालबाह्य होणार; आयोगाने केलं नवे तंत्र विकसित

सरकारनामा ब्यूरो

Election Commission news निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) आणखी एक नवीन तंत्र विकसित केलं आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मतदानादरम्यान बोटावर लावण्यात येणारी शाई आता कालबाह्य होणार आहे. याचं कारण म्हणजे, यापुढे मतदानादरम्यान, शाईऐवजी आता लेझरचा वापर केला जाणार आहे. (Ink on fingers will expire after voting; The commission developed a new technique)

या लेझरने बनवलेली चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये एक कॅमेराही बसवण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Elections) हा नियम लागू होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. तसेच, या वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.

या तंत्राच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील हेराफेरी थांबेल. कारण,बोटाच्या नखावर लेझरने चिन्हाची खूण केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर त्याचे बोगस मतदान पडकडे जाईल.तर दुसरीकडे, ईव्हीएममध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा एआय तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख करून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल. (Maharashtra Politics)

येत्या वर्षभरात 10 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत.यात लोकसभेच्या 122 जागांचाही समावेश आहे, जे एकूण जागांच्या सुमारे 22% आहे. या व्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयात अशा आठ याचिकांवर निर्णय होणार आहे, ज्याचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

मध्य प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जात जनगणना हा मुद्दा बनवण्याच्या तयारीत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी हा मुद्दा बनवून भाजपच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) व्होटबँकेला खिंडार पाडले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT