Abhijit Dipke News : दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत असलेल्या अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. ते आंदोलनस्थळी भाषण करताना असताना अज्ञात महिलेकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यावेळी आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. महिलेला आंदोलकांनी पकडले मात्र तिला मारहाण न करण्याचे आवाहन दीपके यांनी केले.
या घटनेमुळे आंदोनलस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलक संताप व्यक्त करत होते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
सोनम वांगचूक यांना सकाळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनस्थळावरून दूर नेले. त्यावेळी अभिजित दीपके यांना पोलिसांनी धक्काबुकी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दीपकेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
ते म्हणाले, पोलिसांनी शिवीगाळ करत मला मारहाण केली. हे दिल्ली पोलिस नाही तर आरएसएसचे गुंडे आहेत. देशात लोकशाही शिल्लक राहिली नाही, मोदी हे हुकमशाह आहेत.सोनम वांगचुक यांना कुठे घेऊन गेले याची मला कल्पना नाही.'
आपण आजपासून उपोषण करणार असून 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी ते भाषण करत असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.