Sonam Wangchuk Protest : मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, पोलिसांची मोठी कारवाई, अभिजित दीपकेही ताब्यात

Sonam Wangchuk Police : जंतर मंतरवरील २१ दिवसांच्या उपोषणानंतर पोलिसांची धडक कारवाई; सोनम वांगचुक यांना जबरदस्ती हटवून अभिजित दीपके यांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आंदोलकांना मारहाण करत वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून नेले आहे.
Police escort environmental activist Sonam Wangchuk from the protest site during a major crackdown; activist Abhijit Dipke was also taken into custody.
Police escort environmental activist Sonam Wangchuk from the protest site during a major crackdown; activist Abhijit Dipke was also taken into custody.sarkarnama
Published on
Updated on

Sonam Wangchuk News : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थावरून दूर नेले आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात जबरदस्तीने दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर, काॅक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

आंदोलनस्थळावर पोलिसांनी आंदोलकरांना मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. संसदेवर मोर्चा काढत हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठींबा मिळत होता. त्यातच पोलिसांनी ही कारवाई केली.

नीट परीक्षेतील पेपर फुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपके यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचा चेहरा सोनम वांगचुक हे बनले होते.

Police escort environmental activist Sonam Wangchuk from the protest site during a major crackdown; activist Abhijit Dipke was also taken into custody.
Congress Support Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठींबा, उद्धव ठाकरेही दिल्लीत जाणार

वांगचुक यांनी जंतरमंतरवर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठींबा वाढत होता. राजकीय पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला होता. अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेसचे नेते देखील वांगचुक यांना भेटायला जंतरमंतर येथे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी देखील वांगचुक यांना फोन करत पाठींबा दिला होता. तसेच 20 जुलैला ते दिल्लीत जात वांगचुक यांची भेट घेणार होते.

न्यायालयाकडून काळजी व्यक्त...

उपोषणामुळे वांगचुक यांची तब्ब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे न्यायालयाने या विषयी चिंता व्यक्त केली होती. जीवन अनमोल आहे, असे त्यांनी म्हटले होते. अखेर दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांच्यावर उपचार करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, असे म्हणत आंदोलस्थळावरून वांगचुक यांनी उचलून नेले.

Police escort environmental activist Sonam Wangchuk from the protest site during a major crackdown; activist Abhijit Dipke was also taken into custody.
Abhijeet Dipke: "पोलीस येताहेत..." अभिजीत दिपकेंना अटक होणार? स्वतः व्हिडिओद्वारे दिली माहिती; तरुणांना केलं महत्वाचं आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com