Rakesh Tikait news
Rakesh Tikait news  
देश

शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक

सरकारनामा ब्युरो

बंगळुरू : बंगळुरूतील प्रेस क्लबमधील गांधी भवनात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत (Rakesh Tikait) यांच्यावर शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामागे स्थानिक शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर कर्नाटकातील भाजप सरकार या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप राकेश टिकेत यांनी केला आहे. शाई फेकणाऱ्याचं नाव मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. (Rakesh Tikait news)

राकेश टिकेत यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक एका व्यक्तीनं त्यांच्यावर शाई फेकली. याचवेळी टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणाऱ्याला पकडलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंगळूरातील स्थानिक माध्यमांनी चंद्रशेखर यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यात ते बस संपाच्या बदल्यात पैसे मागताना दिसत होते. यावेळी चंद्रशेखर यांनी राकेश टिकेत आणि अन्य शेतकरी नेत्यांचाही उल्लेख केला होता.

पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत राकेश टिकेत यांना चंद्रशेखर यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी. चंद्रशेखर फ्रॉड माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. यावर चंद्रशेखर यांच्या समर्थकांपैकी एकाने समोर बसलेल्या टिकेत यांच्यावर शाई फेकली. शाईफेक झाल्यानं टिकेत समर्थक भडकले आणि त्यांनी त्याला पकडलं. यावेळी चंद्रशेखर आणि टिकेत समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे समर्थक भिडले हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या.

या घटनेनंतर राकेश टिकेत यांनी कर्नाटक सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका केली आहे.सरकारच्या संगनमतानं शाईफेक झाली, स्थानिक पोलिसांनी सुरक्षा न पुरवल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप टीकेत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT