ब्राह्मण महासभेचा ओबीसी आरक्षणाला विरोध

OBC Reservation| Bramhan Mahasangh| यवतमाळमधील श्री समर्थ ब्राम्हण मंडळ व समस्त ब्राम्हण पुरोहित सेवा संस्थेनेही राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या समर्पित ओबीसी आयोगाकडे ओबीसी आरक्षणावर आक्षेप घेणारे पत्र दिले आहे.
OBC Reservation
OBC Reservation
Published on
Updated on

OBC Reservation news

नागपूर : ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) विरोध करणे म्हणजे संविधान विरोधी भूमिका घेवून संकुचित भावना ठेवण्यासारखे आहे. भारतासारख्या देशात बहुसंख्य समाज अजूनही विकासाच्या प्रवाहात न आलेला नसताना आरक्षण ही समानतेची व विकासाची संधी घेवून येत असते. ओबीसी समाजाची आरक्षणासाठी असलेली मागणी ही घटनेच्या चौकटीतील मागणी आहे. यास विरोध करणे म्हणजे संविधान विरोधी भूमिका घेणे होय, असे परखड मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले आहे. (OBC Reservation news)

ओबीसी आरक्षणाला ब्राह्मण महासभेने विरोध केला आहे. राजस्थान विधानसभेत फलोदी विकास परिषदेचे निमंत्रक जगदीश बोहरा यांनी ओबीसी आरक्षण विधेयक मंजूर करण्यास विरोध करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे विधेयक मागे घेऊन आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याशिवाय यवतमाळमधील श्री समर्थ ब्राम्हण मंडळ व समस्त ब्राम्हण पुरोहित सेवा संस्थेनेही राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या समर्पित ओबीसी आयोगाकडे ओबीसी आरक्षणावर आक्षेप घेणारे पत्र दिले आहे.

OBC Reservation
Ravi Rana : मुख्यमंत्र्यांनी याचे-त्याचे फ्लॅट मोजण्यापेक्षा राज्याचे प्रश्न सोडवावेत..

आरक्षण देण्याची पद्धत आता कालबाह्य झाली असून कोणत्याही क्षेत्रात आरक्षण देणे हे योग्य होणार नाही. मुळात राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरजच नाही. असे ब्राम्हण सभा व संस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभुमीवर डॉ. जीवतोडे यांनी आरक्षण विरोधी विचारसरणी ही संकुचित असून अशा विचारसरणीला एक राष्ट्रीय पक्ष खतपाणी घालत असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच समर्पित ओबीसी आयोगाची भेट घेवून व पत्र देवून डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. ज्यावेळी ई.डब्लू.एस. (आर्थिक दृष्ट्या मागास) प्रवर्गास लगबगीने दोन्ही सदनात मान्यता देवून पाच ते सहा टक्के लोकांना दहा टक्के आरक्षण दिले त्यावेळी मात्र कोणीही बोंब केली नाही. कारण याचा फायदा याच लोकांना होणार आहे. अशी दुटप्पी भूमिका घेणे उच्च वर्णीयांना अशोभनीय आहे अशी टीकाही डॉ. जीवतोडे यांनी केली आहे.

तसेच, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे ओबीसी आरक्षण विधेयक आणि समर्पित आयोगाला आरक्षण विरोधी पत्र देवून ब्राम्हण समाजाने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे मत डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com