iPhone Siri 
देश

iPhone Siri: "आयफोन हिंदूविरोधी, 'सिरी' जय श्रीराम म्हणत नाही"; हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

iPhone Siri: या कार्यकर्त्यानं पत्रकार परिषद घेऊन आपल्या दाव्याची पुष्टी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं सिरीला सर्वांसमोर 'जय श्री महाकाल' आणि 'जय श्रीराम' असं विचारलं.

Amit Ujagare

iPhone Siri: एकीकडं अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांवर खुद्द याच्या विश्वस्त मंडळींनीच डल्ला मारल्याचं प्रकरण सध्या देशभरात गाजत असताना आता रामाच्या नावानं आणखी एक वाद समोर आला आहे. अमेरिकनं कंपनी असलेल्या अॅपलचा आयफोन हा हिंदूविरोधी असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं केला आहे. यासाठी त्यानं पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदेत आरोप करताना संबंधित कार्यकर्त्यानं दावा केला की, अॅपलचं व्हॉईस असिस्टंट हिंदूंच्या मान्यतांचा सन्मान करत नाही. तसंच लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं आयफोन हा भारतीय संस्कृतीच्या विरोधी असून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण सिरीला विचारल्यानंतर ती 'अस्सलाम वलैकुम' असं म्हणते पण 'जय श्रीराम' म्हणत नाही. उज्जैनमधील आणि देशभरातील करोडो हिंदू लोक आयफोन वापरतात. पण त्यांच्यासोबत ही फसवणूक होत आहे. कारण आमचा डेटा हा अॅपलकडं आहे. तसंच हा आमच्याविरोधातील कट असल्याचा आरोपही या व्यक्तीनं केला आहे.

आपल्या दाव्याला पुष्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी याचा थेट डेमोच दाखवण्याचा प्रयत्न केला. यासाठी या व्यक्तीनं भर पत्रकार परिषदेतच आयफोनचं व्हॉईस असिस्टंट असलेल्या सिरीला कमांड दिली 'जय श्री महाकाल' आणि 'जय श्रीराम'. पण त्यावर सिरीनं प्रतिसाद दिला नाही, असा दावाही या व्यक्तीनं केला आहे.

हिंदूंविरोधात कट-कारस्थान सुरु

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं पुढं हे देखील सांगितलं की, आयफोन हा आता भारतात स्टेट्स सिम्बॉल बनला आहे. त्यामुळं अनेक लोक प्रचंड मोठ्या किंमती असतानाही आयफोन कर्ज घेऊन विकत घेत आहेत. पण कंपनी अद्यापही भारताच्या संस्कृतीचा सन्मान करताना दिसत नाही, असा आरोपही त्यानं केला आहे.

या आरोपांवर अद्याप अॅपल कंपनीकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. यामध्ये सिरीनं दिलेल्या प्रतिक्रियेची अॅपलकडून वैयक्तिक पडताळणी झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT