

Pune News: पुण्यातील लोहगड येथे केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी सिया गोयलकडून हा हत्येचे गुढ उकलण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. काल पोलिस सियाला घेऊन तिच्या घरी गेले होते
सियाला कधी तिला घटनास्थळी तर कधी ज्या ठिकाणी केतनला धक्का देण्यात आला त्या लोहगडावर नेऊन तपास केला जात आहे. आता या प्रकरणात सियाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात येणार आहे. तिने देत असलेल्या माहितीची सत्यता या माध्यमातून पडताळून पाहण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी सिया गोयलच्या लाई डिटेक्टर चाचणीसाठी संभाव्य प्रश्नांची यादी तयार केली आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून केतन अग्रवालच्या मृत्यूमागील संपूर्ण कट आणि घडामोडी उघड करण्याचा पोलिसांचा उद्देश असल्याचे याबाबतचे वृत्त एनडी टिव्ही इंडियाने दिली आहे.
१८ जून रोजी लोहगड किल्ला परिसरात नेमकं काय घडलं, याबाबत पोलिस सियाकडे सविस्तर चौकशी करणार आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांतून केतनच्या मृत्यूमागील सत्य समोर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.
1. तुमचं नाव सिया गोयल आहे का?
2. तुम्ही स्वतःच्या इच्छेने लाय डिटेक्टर चाचणीत सहभागी होत आहात का?
3. तुम्ही केतन अग्रवालला वैयक्तिकरित्या ओळखत होतात का?
4. तुमचा आणि केतन अग्रवालचा साखरपुडा झाला होता का?
5. तुम्ही चेतन चौधरीला वैयक्तिकरित्या ओळखता का?
6. जून २०२६ दरम्यान तुमचा चेतन चौधरीसोबत नियमित संपर्क होता का?
7. तुम्ही १८ जून २०२६ रोजी लोहगड परिसरात गेल्या होतात का?
8. १८ जून रोजी तुमची केतन अग्रवालसोबत भेट झाली होती का?
9. त्याच दिवशी तुमची चेतन चौधरीसोबतही भेट झाली होती का?
10. १८ जून रोजी तुम्ही, केतन आणि चेतन एकाच ठिकाणी उपस्थित होतात का?
11. १८ जूनपूर्वी तुम्ही केतनला लोहगडला येण्यास सांगितलं होतं का?
12. तुम्ही चेतन चौधरीसोबत लोहगडला जाण्याचा प्लॅन आखला होता का?
13. घटनेपूर्वी तुम्ही केतनची लोकेशन किंवा हालचालींची माहिती चेतन चौधरीला दिली होती का?
14. १८ जून रोजी लोहगड येथे केतन अग्रवालसोबत कोणती शारीरिक झटापट झाली होती का?
15. तुम्ही केतन अग्रवालला कोणत्याही प्रकारे धक्का दिला होता का?
16. तुम्ही इतर कोणाला केतनला धक्का देताना पाहिलं होतं का?
17. घटनेनंतर तुम्ही या प्रकरणाशी संबंधित चॅट, मेसेज, कॉल रेकॉर्ड किंवा डिजिटल डेटा डिलीट केला होता का?
18. केतन अग्रवालच्या मृत्यूचं खरं कारण किंवा परिस्थितीबाबत अशी कोणती माहिती तुम्हाला माहित आहे का, जी तुम्ही अद्याप तपास यंत्रणांना सांगितलेली नाही?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.