Akash Tomar, Allu Arjun in Pushpa Film Srakarnama
देश

आयपीएस अधिकाऱ्याची 'पुष्पा'ला टक्कर; आधी कारवाई केली अन् म्हणाले....

सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून या अधिकाऱ्याचे ट्विट व्हायरल झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटातील डायलॉग आता अनेकांच्या तोंडांत रेंगाळत आहेत. चित्रपटात पोलीस आणि चंदनाच्या लाकडाच्या तस्करांमधील एकप्रकारचे युध्द दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीसांच्या (Police) तोंडीही आता या चित्रपटातील संवाद येऊ लागले आहेत. एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने प्रतिबंधित लाकडांची तस्करी करणाऱ्यांना 'पुष्पा'च्याच भाषेत थेट इशारा दिला आहे. याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून या अधिकाऱ्याचे ट्विट व्हायरल झाले आहे.

'पुष्पा नाम सुनके, फ्लॉवर समझा क्या, फायर है फायर', झुकेगा नहीं असे काही संवाद प्रसिध्द झाले आहेत. राजकारणापासून पोलिसांपर्यंत अनेक जण विविध कारणांसाठी या संवादांचा वापर करताना दिसत आहेत. आयपीएस आकाश तोमर (Akash Tomar) यांनी असंच एक ट्विट आहे. तोमर हे सहारनपुरचे पोलीस अधिक्षक आहेत. रविवारी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गागलहेडी पोलिसांनी तब्बल 11 हजार 50 किलो वजनाची खैराचे लाकूड पडकले. या लाकडाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या लाकडाची किंमत जवळपास 20 लाख रुपये एवढी असल्याचे सांगितले जात आहे.

या कारवाईनंतर तोमर यांनी ट्विट करत कारवाईची माहिती दिली. पण ही माहिती देताना त्यांनी पुष्पा चित्रपटातील संवादाची आठवण करून दिली. तोमर यांनी ट्विट करत म्हटले की, 'यहाँ पुष्पा नहीं, कानून का राज चलता है.' खैराची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. सहारनपूर पोलिसांनी चांगले काम केले आहे, असंही तोमर म्हणाले आहेत. तोमर यांचे हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते पियुक्त मिश्रा यांनीही त्याच स्टाईलमध्ये त्यांचे कौतुक केलं आहे.

आकाश तोमर हे चांगल्यांसाठी फ्लॉवर आहेत आणि आरोपींसाठी फायर. कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, असं मिश्रा म्हणाले आहेत. जिथे पोलीसांचे कॅप्टन आकाश तोमर असतील तिथे पुष्पाही दूर राहतो, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. तर दिनेश शुक्ला म्हणाले की, पुष्पाला माहिती असायला हवे, उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. अटकही होईल, झुकेलही आणि जेलमध्येही जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT