काँग्रेसला धक्का : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरताच बड्या नेत्याची निवडणूक न लढण्याची घोषणा

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला.
CM Charanjit Singh Channi, Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu, Sunil Jakhar
CM Charanjit Singh Channi, Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu, Sunil JakharSarkarnama
Published on
Updated on

चंदीडगड : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला. या पदासाठी विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनाच सत्तेवर आल्यानंतर संधी देऊ, असे त्यांनी स्पष्ट केलं. पण या घोषणेनंतर पक्षातील एका बड्या नेत्यांनं यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यापुढे ते निवडणुकीच्या राजकारणातून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Punjab Election 2022)

पंजाब (Punjab) काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व प्रचार समितीचे अध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांनी याबाबत रविवारी स्पष्ट संकेत दिले. जाखड यांनी चन्नी यांच्या नावाला विरोध केलेला नाही. राहुल गांधी यांनी घेतला निर्णय योग्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष एकजुट असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर्गत नाराजी नसल्याचेही सांगितले. पण आपली भूमिका स्पष्ट करताना यापुढे निवडणूक लढणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. जाखड हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले नाहीत.

CM Charanjit Singh Channi, Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu, Sunil Jakhar
सव्वीस वर्षांच्या राजकारणानंतर सुरेश प्रभुंची मोठी घोषणा; आता फक्त एकच ध्येय...

जाखड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्याला या पदासाठी 42 आमदारांचा पाठिंबा होता. तर चन्नी यांना केवळ दोन मतं मिळाली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना सहा तर सुखजिंदर रंधावा यांना 16 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता, असं जाखड यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून ते नाराज असल्याची चर्चा होती. चन्नी यांच्यासह जाखड व सिध्दू हेही या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये होते.

दरम्यान, लुधियाना येथे रविवारी झालेल्या व्हर्च्युअल रॅलीत चन्नी यांच्या नावाची घोषणा राहुल यांनी केली. सिद्धू आणि सुनील जाखड हे दमदार नेते या स्पर्धेत असताना चन्नी यांनी बाजी मारली आहे. चन्नी हे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. पंजाबमध्ये सुमारे तीस टक्के दलित मते आहे. त्यामुळे एक मोठी खेळी काँग्रेसने या निमित्ताने खेळली आहे. राहुल यांनी अमृतसर येथे सुवर्णमंदिरात भेट दिली होती. त्याच वेळी त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नक्की जाहीर करू, असे आश्वासन दिले होते. चन्नी यांनी आपली प्रतिमा हा सामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणून करण्यात यश मिळवले आहे. साधी राहणी आणि कोणांतही सहज मिसळून जाणे या त्यांच्या कृतीमुळे त्यांचाही चाहता वर्ग तयार झाला आहे.

आपल्या नावाच्या घोषणेनंतर चन्नी म्हणाले की, हे सर्व जनतेच्या कृपेने होत आहे. कन्हैयाच्या कृपेने माझे नाव होत आहे. मला हिम्मत हवी आहे, पैसा हवा आहे, मला पंजाबची जनता हवी आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची इच्छा आहे, तरच मी ही लढाई लढू शकेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच मी कधीही चुकीचे काम करणार नाही. चुकीचा पैसा घरी येऊ देणार नाही, फक्त पारदर्शकता राहील. मी पंजाबचे सोने करेल. नवज्योतसिंग सिद्धूचा मॉडेल सारखा पंजाब बनेल. सिद्धूसाहेबांना जे करायचे असेल ते ते करतील. जाखड साहेबांचे नेतृत्व पंजाबला पुढे घेऊन जाईल, मी यातला फक्त एक माध्यम म्हणून आहे, अशीही टोलेबाजी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com