IPS Mohammad Nurul Hoda joins Vikassheel Insaan Party: Sarkarnama
देश

Bihar Politics: 'खादी' च्या मोहासाठी 'खाकी' सोडली! आणखी एका IPSची राजकारणात एन्ट्री

IPS Mohammad Nurul Hoda joins Vikassheel Insaan Party: गेल्या काही दिवसापासून ते राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु होती. वक्फ संशोधन विधेयक दुरुस्तीला मंजूरी दिल्याने होदा हे नाराज होते. त्याला विरोध करीत त्यांनी राजीनामा दिला.

Mangesh Mahale

IPS Mohammad Nurul Hoda, VIP Party Entry : बिहारच्या राजकारणात आणखी एका अधिकाऱ्याने एन्ट्री घेतली आहे. भारतीय पोलिस दलातील सनदी अधिकाऱ्याने (IPS) पोलिस दलातील 'खाकी'सोडून 'खादी' परिधान केली आहे.

आयपीएस मोहम्मद नुरुल होदा असे त्यांचे नाव आहे. त्यांनी बिहारच्या वीआईपी (vip)मध्ये प्रवेश घेतला आहे. होदा हे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी रेल्वेच्या महानिरीक्षक पदाता राजीनामा दिला आहे. त्यांनी मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली आहे.

स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सीतामढी जिल्ह्यातील ते रहिवाशी आहेत. ते रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी नक्सलग्रस्त भागात सुरक्षा व्यवस्था आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठे योगदान आहे.

बिहारमधील मुस्लिम समाजाल सक्षम नेतृत्व देण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. समाजातील गरीबी आणि आर्थिक विषमता संपवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक दारित्र्य संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

गेल्या काही दिवसापासून ते राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु होती. वक्फ संशोधन विधेयक दुरुस्तीला मंजूरी दिल्याने होदा हे नाराज होते. त्याला विरोध करीत त्यांनी राजीनामा दिला. सरकारी नोकरीतून मुक्त होताच त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. मुकेश सहनी यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

बिहारमध्ये प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. लोकसभा निवडणुकीतही अनेक पोलिस अधिकारी राजकारणात आपले नशीब आजमावताना दिसले होते.

अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मैदान मारण्यासाठी डाव आखत आहेत. बिहारमध्ये आगामी निवडणुकीत अनेक पोलिस अधिकारी यापूर्वी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यातील काही अधिकारी सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT