Iranian gunboats patrol the Hormuz Strait after attacking Indian ships, intensifying the ongoing Hormuz Strait crisis and global oil supply concerns. Sarkarnama
देश

Iran Attacks Indian Ships : होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये पहिल्यांदाच इराणचा थेट भारतीय जहाजांवर हल्ला; सरकारने घेतली मोठी अॅक्शन

Hormuz Strait Crisis Iran Attacks Indian Ships : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा इराणमे होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. शिवाय या मार्गावर इराणने कडक निर्बंध लादले आहेत.

Jagdish Patil

Iran Attacks Indian Ships : इस्रायल-लेबनॉन मध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर कुठेतरी मध्य-पूर्वेतील संघर्ष कमी होईल असं वाटत होतं. त्यानंतर शुक्रवारी इराणने देखील होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आता अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. शिवाय या मार्गावर इराणने कडक निर्बंध लादले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे इराणने निर्बंध लादल्यानंतर इराणच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याची घडना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ज्या जहाजांवर हल्ला केला आहे. ती जहाजं इराकमधून तेल घेऊन येत होती.

यातील एक जहाज भारताचे होते. या जहाजांवर सुमारे 20 लाख बॅरल इतके तेल होते. गोळीबाराच्या या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक पावले उचलली असून त्यांनी इराणच्या राजदूतांना समन्स पाठवले आहे. भारतीय जहाजांवररील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारत सरकारने हे समन्स पाठवलं आहे.

नेमकं काय घडलं?

भारताचे मालवाहतूक जहाज 'जग अर्णव' व तेलवाहू जहाज 'सनमार हेराल्ड' हे ओमानच्या ईशान्येला 25 सागरी मैलावर असताना या इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या जहाजांना मार्ग बदलण्यास सांगितले. त्यादरम्यान जहाजावर गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांना समन्स बजावले आहे.

इराणची भूमिका

दरम्यान, अमेरिकेने इराणी बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीमुळे आणि अमेरिकेकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने आपण पुन्हा होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद करत असल्याचं इराणने जाहीर केलं आहे. त्यानुसार आता इराणने सर्व व्यापारी जहाजांना होर्मुजमधून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्व वाहतूक आपल्या लष्करी नियंत्रणाखाली असेल, असे इराणने जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT