

Hingoli News : देशातील महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारे 'नारी शक्ती' विधेयक शुक्रवारी(ता.17) लोकसभेत बहुमताअभावी नामंजूर झाले. त्यानंतर देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुतीच्या वतीने सरकार विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. हिंगोली शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या पक्षांचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात आमदार संतोष बांगर यांनी काँग्रेसवाल्यांना या देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत टीका केली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नारी शक्तीचा सन्मान करत त्यांना 33 टक्के राजकीय आरक्षणाचा निर्णय घेतला. याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूरीसाठी ठेवले. पण काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्याच्या विरोधात मतदान करत ते फेटाळले.
खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी अशा नत दृष्टांचा शिरछेद केला असता. या काँग्रेस पक्षाला देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका संतोष बांगर यांनी केली. सत्ताधारी पक्षांच्या टीकेला काँग्रेस पक्षानेही प्रत्युत्तर दिले आहे.
2023 मध्येच 'नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023', म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले असल्याची आठवण काँग्रेसने करून दिली.
संसदेत काल महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले, त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी लोकशाहीचा मोठा विजय झाला. मोदी सरकारने लोकशाही कमकुवत करण्याचा संघराज्यीय संरचना बदलण्याचा कट रचला होता, तो आम्ही हाणून पाडल्याचा दावा केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.