US-Iran-Israel war sarkarnama
देश

Iran News: युद्धानं होरपळलेल्या इराणचा लष्कराच्या दबावाखाली ऐतिहासिक निर्णय; अमेरिका-इस्त्रायलचे हल्ले रोखण्यासोबतच ही मोठी रणनीती?

Middle East Amid Iran Conflict : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे वयाच्या 86 व्या अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाला होता. 1989 पासून 36 वर्षे देशाचे नेतृत्व केलं होतं. खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत होते

Deepak Kulkarni

Iran News: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात इस्त्रायल आणि अमेरिका इराणवर जोरदार हल्ले चढवले जात आहे. तर इराणही माघार घेण्याच्या तयारीत नसून अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युद्धानं होरपळलेल्या इराणमधून आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे वयाच्या 86 व्या अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाला होता. 1989 पासून 36 वर्षे देशाचे नेतृत्व केलं होतं. खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत होते. पण आता अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणची खामेनी यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यामागे अमेरिका-इस्त्रायलचे हल्ले रोखण्यासोबतच इतरही मोठी रणनीती असल्याचं बोललं जात आहे.

इराणच्या संविधानानुसार, राष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याची निवड असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सद्वारे करण्यात येते. ही संस्था देशाच्या सर्वोच्च नेत्याची निवड तसेच देखरेख करण्यासाठीची एक शक्तिशाली धार्मिक संस्था मानली जाते. या आयआरजीसी संस्थेची ओळख ही आजपर्यंतची इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी आणि धोरणात्मक संस्था अशी राहिली आहे. या संस्थेचा देशाच्या राजकीय आणि सुरक्षा संरचनांवर मोठा प्रभाव राहिला आहे.

एकंदरीत अमेरिका-इस्त्रायलसोबतच्या युद्धजन्य तणाव परिस्थितीमुळे संकटात सापडलेली संरक्षक परिस्थिती लक्षात घेता या घडीला इराणच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर आयआरजीसीकडून तातडीनं निर्णय घेण्यासाठी दबाव आणण्यात आला होता.

आयआरजीसीच्या याच दबावापुढे झुकत अखेर नेतृत्वाभोवतीची अनिश्चितता संपवण्यात आली आहे. आता इराणकडून सुप्रीम लीडर म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मोजतबा खामेनी यांच्याकडे कट्टरपंथीय, आक्रमक आणि इराणच्या राजकारणावर प्रचंड पकड असलेला राजकीय रणनीतीकार म्हणून पाहिलं जातं.

मोजतबा खामेनी यांना इराणमधील सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये दीर्घकाळ प्रभावशाली नेते राहिले आहेत. सुरक्षा यंत्रणांशी त्यांची जवळचे संबंध आहेत. परंतू, आजतागायत त्यांनी कधीही औपचारिकपणे मोठं संवैधानिक पद भूषवलेलं नाही.

तर दुसरीकडे अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मशहदमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या वडिलांची कबर देखील मशहदमधील इमाम रेझा दर्ग्यात आहे. तथापि,  अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मोजतबा खामेनी यांचा परिचय

अयातुल्ला अली खमेनी यांचे दुसरे पुत्र असलेले मोजतबा होसेनी खामेनी यांचा जन्म 8 सप्टेंबर 1969 रोजी झाला आहे. त्यांची ओळख एक प्रभावशाली इराणी धर्मगुरू व राजकारणी अशी देखील राहिली आहे. मोजतबा यांचा रिव्होल्युशनरी गार्ड्सवर मोठा प्रभाव मानला जातो. त्यांनी 1987-88 च्या इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता.

तसेच, मोजतबा खामेनी यांनी 2009 मधील निवडणुकांमधील निषेध दडपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'बासीज' (Basij) या निमलष्करी दलाची सूत्रं सांभाळली होती. त्यांचे इराण आणि इराणबाहेरील अनेक कंपन्या व मालमत्तांवर नियंत्रण असल्याचं बोललं जात आहे. हे मोजतबा खामेनी यांच्या निवडीपाठीमागचं मोठं कारण असल्याची चर्चा आहे.तसेच सुप्रीम लीडर बनलेल्या मोजतबा खामेनी यांच्यामुळे इराणच्या सत्तेत घराणेशाहीची पाळंमुळे आणखी बळकट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT