Bjp Masterstoke : भाजपचा 'मास्टरस्ट्रोक' : डॉ. महात्मेनंतर दिली रामराव वडकुतेंना राज्यसभेची संधी; धनगर समाजाला पुन्हा मिळालं 'दिल्ली'चं बळ!

social engineering formula News : डॉ. विकास महात्मे यांच्यानंतर धनगर समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व देण्याची ही दुसरी मोठी संधी भाजपने या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.
Ramrao vadkute, vikas mahtame
Ramrao vadkute, vikas mahtameSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात राज्यात राज्यसभेच्या सात जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारी जाहीर करीत असताना दोन जुन्या तर दोन नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग साधला आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील रामराव वडकुते यांच्या नावाचा समावेश करून सर्वांनाच धक्का दिला आहे. डॉ. विकास महात्मे यांच्यानंतर धनगर समाजाला राज्यसभेत प्रतिनिधित्व देण्याची ही दुसरी मोठी संधी भाजपने या निमित्ताने उपलब्ध करून दिली आहे.

भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देत असताना धक्कातंत्र अवलंबले आहे. भाजपच्या यादीत माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawade), केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावे अपेक्षित होती, मात्र माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या सारख्या नवख्या उमेदवारांना संधी देताना भाजपने सोशल इंजिनीअरिंगचा फॉर्म्युला वापरत भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आहे.

Ramrao vadkute, vikas mahtame
Satara ZP : सातारा ZP तील सत्तेबाबत शिवेंद्रराजेंचं मोठं विधान, ‘आम्ही शंभूराज देसाईंकडे बघत बसलोय...’

वडकुते यांना उमेदवारी देताना मराठवाड्यातील जातीय समीकरण साधताना या भागातील धनगर समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित करून भाजपने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डॉ. विकास महात्मे 2016-2022 दरम्यान राज्यसभेचे खासदार होते. महात्मे यांच्यानंतर धनगर समाजाचा कोणताही मोठा चेहरा राज्यसभेत नव्हता. सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, रामराव वडकुते यांना संधी देऊन भाजपने या समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. वडकुते हे मूळचे मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर भागातील आहेत.

Ramrao vadkute, vikas mahtame
Pune Congress : स्वीकृत नगरसेवकाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; सतेज पाटलांची गेम चेंजर भूमिका; पुण्यातील 'त्या' उमेदवारांची धडधड वाढली

रामराव वडकुते हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधान परिषदेचे सदस्यही होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने (BJP) पवारांच्या जुन्या शिलेदाराला मोठी ताकद दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2002 मध्ये रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले होते.

Ramrao vadkute, vikas mahtame
NCP Meeting : 'आम्ही ढवळाढवळ करणार नाही...', दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं; राष्ट्रवादीच्या बैठकीची इनसाईट स्टोरी!

परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले आहेत. धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. धनगर आरक्षणासाठी त्यांनीही आवाज उठवला आहे. रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे येत्या काळात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ते धनगर समाजाच्या प्रश्नांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

Ramrao vadkute, vikas mahtame
BJP candidates list : मोठी बातमी : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर; तावडे, आठवलेंसह चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब, मातब्बरांना धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com