Iran War News: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली. याबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेले संयुक्त कारवाईत खामेनेई यांना संपविण्यात आले होते. कशापद्धतीने इस्त्रायलने तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले, नेटवर्क सेवेत देखील बिघाड केला होता. संधी साधत इस्त्रायलच्या गुप्तहेर संघटना 'मोसाद'ने खामेनेई यांचा गेम केला.
खामेनेई यांच्या हत्येपूर्वी म्हणजे 22 फेब्रुवारीला त्यांना आपली हत्या होणार याची माहिती गुप्तहेराकडून मिळाली होती. याबाबत खामेनेई यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली होती. त्यांचा प्लॅन बी तयार होता. पण एका चुकीमुळे ते सहजपणे दोन्ही शत्रूंच्या तावडीत सापडले अन् त्यांना आपल्या जीव गमवावा लागला.
इस्त्रायलने खामेनेई यांना मारण्याचा कट रचण्यापूर्वी त्यांच्या रडारवर खामेनेई यांचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी होते. खामेनेई यांच्या सुरक्षा रक्षकांवर नजर ठेवण्यासाठी इस्त्रायलने तेहरान के ट्रैफिक कैमरे हैक केले होते. त्यात हस्तक्षेप करुन खामेनई यांच्या प्रत्येक हालचालीवर 'मोसाद'कडून नजर ठेवण्यात येत होती.
इराण सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी या ट्रैफिक कैमऱ्यांची मदत घेतली जात होती. पण या यंत्रणेचा फायदा घेण्यास शत्रूराष्ट्रांना यश मिळाले. खामेनेईंना धोक्याची कसलीच माहिती मिळू नये, याची पूर्ण काळजी इस्त्रालयने घेतली होती.
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) ऐनवेळी अशी माहिती दिली की हल्ल्याची वेळ रात्रीऐवजी दिवसा निश्चित करण्यात यावी, कारण दिवसा खामेनी स्वतःला जास्त सुरक्षित समजत होते. ते बेसावध असताना हल्ला करण्याचा यामागे हेतू होता
22 फेब्रुवारी रोजी NYTच्या अहवाल प्रसिद्ध कऱण्यात आला होता. त्यानुसार, खामेनेई यांनी त्यांच्या उच्च सुरक्षा अधिकारी आणि नेतृत्वाला आदेश दिले होते की आपल्या बड्या नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो, यासाठी सज्ज राहा. त्यांनी प्रत्येक बड्या नेत्याला त्यांच्या खालील चार पातळ्यापर्यंत वारसदार (उत्तराधिकारी) नियुक्त करण्यास सांगितलं होतं.
इस्त्रायलने कँमेरा हँक केल्यानंतर त्यांनी तो त्यांच्या टार्गेटवर सेट केला. या माध्यमातून खामेनेई यांचे सुरक्षा अधिकारी कुठे कार पार्क करतात, याची माहिती मिळत होती. या कैमेऱ्यांच्या माध्यमातून इस्त्रायल गुप्तचर संघटना मोसाद यांना सुरक्षारक्षकांचे पत्ते, कामाचे नियोजन, त्यांना कुणाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले याची माहिती मिळत होती. त्यांनी ही सर्व माहिती संकलित केली.
खामेनेई यांना सहा दिवस आधी हत्येची माहिती मिळाली होती. त्यामुळे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने खामेनेई यांना त्यांचं राहण्याचं आणि कामाचं ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला होता, पण खामेनेई यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. सुरक्षा उपाय वाढवण्याऐवजी गोष्टी शक्य तितक्या सामान्य ठेवण्यावर त्यांचा भर होता.पण त्यांची हीच चूक त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली.
इस्त्रायलने इराण आणि त्याच्या नेत्यांच्या हालचालींवरील माहिती जमा करण्यात आली होती. यातील आवश्यक व योग्य ती माहिती घेण्यासाठी AI टूल्स आणि एल्गोरिदम या वापर करण्यात आला होता. AIडेटा ने इस्त्रायला शनिवारी खामेनेई यांच्या बैठकीपर्यंत जाण्यासाठी मदत केली. अमेरिकेच्या CIAचा ह्यूमन सोर्स कडूनही माहिती गुप्तहेर संघटनांना दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.