Minab School Attack | Mary Trump Reaction : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आतापर्यंत शेकडो नागरिकांचे बळी घेतले आहेत. मात्र, या सर्व हल्ल्यांमध्ये सर्वात भयंकर आणि विनाशकारी हल्ला हा दक्षिण इराणमधील मिनाब शहरात करण्यात आला.
इस्त्राईलने मिनाब शहरातील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात तब्बल 165 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका केली जात आहे. नुकतंच या मृत मुलींवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यसंस्कारासाठी हजारो इराणी नागरिक जमा झाले होते. या विद्यार्थिनींना दफन जेसीबीच्या साहाय्याने165 कबरी खोदण्यात आल्या होत्या. या कबरींचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अमेरिकेतूनही युद्धावर तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी, मेरी एल. ट्रम्प यांनी या कबरींचा फोटो शेअर करत थेट आव्हान दिले आहे. "मी आव्हान देते की, कुणीही या क्रूर हल्ल्याचे समर्थन करून दाखवावे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तर मेरी एल. ट्रम्प यांनी या युद्धाचा जाहीर निषेध केला आहे. या संघर्षामुळे असंख्य जीव आणि अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या कृत्यावर त्यांच्या घरातूनच विरोध होताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जो फोटो पाहून डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी संतापली आहे. तो दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील आहे. या ठिकाणी 165 शाळकरी मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कबर खोदण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला आहे. 165 कबरींचा उंचावरून घेतलेला फोटो पाहून संपूर्ण जग हादरलं आहे.
या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका होऊ लागल्यानंतर इस्त्रायली लष्कराने आपणाला या हल्ल्याबाबत कल्पना नव्हती, असा दावा केला आहे. मात्र, इराणचे परराष्ट्रमंत्री इस्माईल बाघेई यांनी अमेरिका आणि इस्त्राईल हे दोन्ही देश सातत्याने निवासी भागाला लक्ष्य करत आहेत. शाळा, रुग्णालये, सांस्कृतिक वारसास्थळे आणि उपचार केंद्रांना लक्ष्य केले जात आहेत, असा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.