

Maharashtra Rajya Sabha election : महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारासाठी पक्षनेतृत्वाकडे लॉबिंग केली होती. मात्र, सगळ्यांनाच धक्का देत भाजपने दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भाजपने आज चार उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसेच माया ईवनाते व रामराव वडकुते यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ईवनाते व वडकुते यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने या निवडणुकीतही धक्कातंत्र कायम ठेवले.
विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने होती. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली आहे. पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर तावडेंनी आपला ठसा उमटविला आहे. सदस्य नोंदणीची विक्रमी कामगिरी करत त्यांनी आधीच पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर ते प्रभारी असताना बिहार, हरियाणामध्ये पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजयही तावडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे बिहारमधूनच आहेत.
मागील काही दिवस रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत मात्र उलटसुलट चर्चा होत्या. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. मात्र, त्यांच्या मागे उभी असलेली आंबेडकरी चळवळीची ताकद पाहता भाजपने त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी देण्यात मागेपुढे पाहिले नाही.
ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून सध्या विद्यमान नगरसेविकाही आहेत. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या त्या सदस्याही आहेत. त्यांच्यारुपाने भाजपने आदिवासी समाजातील महिलेला राज्यसभेत पाठविले आहे. तर वडकुते हे हिंगोलीतील असून विधान परिषदेचे माजी आमदार आहे. ते भाजपचे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख होते. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्षही आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.