Donald Trump Iran warning news : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत होर्मूझ मार्ग खुला न केल्यास ऊर्जा प्रकल्प, प्रमुख पुलांना उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली होती. मात्र, ही डेडलाईन संपण्याआधीच इराणवर अमेरिका-इस्त्राईलकडून हल्ले सुरू झाल्याचे वृत्त आहे.
इराणवरील पहिला मोठा हल्ला इराणसह जगासाठी महत्वाच्या असलेल्या खार्ग बेटावर करण्यात आला आहे. इराणसाठी हे देशातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. अल-अरबी टीव्हीच्या रिपोर्टनुसार, काही वेळापूर्वीच खार्ग बेटावर अनेक भीषण स्फोट पाहायला मिळाले. संपूर्ण बेट धमाक्यांनी हादरल्याचे वृत्त आहे. एका रेल्वे पुलावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
खार्ग बेट हे इराणचा आर्थिक कणा मानला जाते. जवळपास ९० टक्के कच्चे तेल या बेटावरून निर्यात होते. अमेरिकेने याच बेटाला टार्गेट केल्याने इराणवर मोठे आर्थिक संकट येऊ शकते. एवढेच नाही तर त्याचा परिणाम जगातील अनेक देशांवर होऊ शकतो. खार्ग बेटातून होणारी कच्च्या तेलाची निर्यात थांबल्यास अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची समस्या उद्भविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खार्ट बेटावरील हल्ल्यानंतर इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्पसने आता संयम संपला आहे, असा गर्भित इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणला सोमवारी ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता. पण इराणने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती.
अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. IRGC ने सोमवारीचे तसेच संकेत दिले होते. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांशी संबंधित सुविधांना टार्गेट केले जाईल, असे म्हटले होते. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमधील ऊर्जा प्रकल्प राखेत बदलतील, असा इशारा देण्यात आला होता. मागील महिन्यातही अमेरिकेने खार्ग बेटावर हल्ला करत लष्कराला टार्गेट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.