US Israel Iran conflict news : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले असून, याचा जगाला फटका बसू लागला आहे. या युद्धाच्या सुरवातीलाच इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांचा मृत्यू झाल्याने हे युद्ध अधिक लांबण्याची शक्यता आहे.
पश्चिम आशियात युद्धाग्नीची धग पोचू लागली असून, इराणने दुबईला देखील लक्ष्य केलं आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल दागलेल्या क्षेतपणास्त्र हल्ल्यात दुबईतील विमानतळाच्या धावपट्ट्यांना लक्ष्य केलं. हे सर्व ‘तणावपूर्ण आणि भीतीदायक’ असे म्हणत ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ येत असलेल्या स्फोटाच्या आवाजांचा आणि तेथे अडकून पडल्या अनुभवाचं कथन केलं आहे.
इराणने प्रत्युत्तरादाखल सुरू केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दुबईतील विमानतळाजवळ (Airport) झालेल्या स्फोटामुळे अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केलीत. सिंधू ही तीन मार्चपासून बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ‘ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धे’त सहभागी होणार आहे; मात्र हवाई क्षेत्र बंद झाल्याने ती शनिवारीपासून दुबईत अडकली आहे.
‘‘आमचे विमान दुबईत उतरल्यावर परिस्थिती झपाट्याने बदलली. हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि गेल्या काही तासांत प्रचंड तणाव होता. आमच्या डोक्यावरून क्षेपणास्त्र (War) अडवण्याचे आवाज ऐकू येत होते,’’ असे सिंधूने खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
‘‘काही तासांनी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्या विमानतळाजवळच स्फोट झाला. माझे प्रशिक्षक तेथून सुमारे 100 मीटर अंतरावर होते आणि त्यांना तातडीने जागा बदलावी लागली. इतक्या जवळून असा प्रसंग अनुभवणे हादरवून टाकणारे आहे’’ असे ती म्हणाली.
आम्ही सुरक्षित आहोत; पण चिंता कायम आहे, असे सिंधूचे प्रशिक्षक इरवांस्य आदि प्रतामा यांनी सांगितले. दरम्यान, विमानतळ प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयानेही तत्पर मदत केली, असे सिंधूने सांगितले.
दरम्यान, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)ने बॅडमिंटन इंग्लंड अन् राष्ट्रीय संघटनांशी समन्वय साधून प्रवासातील अडचणींवर लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. बहुतेक बर्मिंगहॅमला पोहोचले असले तरी सिंधूसह काही जण अद्याप अडकले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.