Petrol price in India : भारतात पेट्रोल 200 लिटर पार जाणार? महागाईचा भडका उडणार? मोदींनी बोलावली तातडीची बैठक, इराण-इस्त्राईल-अमेरिकेच्या युद्धाग्नीची झळ!

Iran-Israel-US War Impact, Petrol Prices in India : इराण-इस्त्रायलने-अमेरिकेमधील युद्धाग्नीमुळे भारतामधील इंधनाचे, पेट्रोल दर भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Petrol price in India 1
Petrol price in India 1Sarkarnama
Published on
Updated on

Iran Israel US war impact : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेऊन, त्या देशावर जोरदार हल्ले चढवला. इराणमधील धार्मिक, राजकीय आणि लष्करी तळाला लक्ष्य केलं. यात इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांचा मृत्यू झाला. इराणने देखील प्रत्युत्तर देत इस्त्रायलसह, कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले करण्यात आली.

युद्धाग्नीची तीव्रता वाढल्यास त्याची सर्वाधिक झळ भारताला बसू शकते, आणि भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री दिल्लीत पोहोचत आहे. तिथं ते लगेचच कॅबिनेट कमिटी आॅन सिक्योरिटीची बैठक घेणार आहे. ही बैठक रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे.

इराण-इस्त्रायलने-अमेरिकेमधील युद्ध भारतापासून 2 हजार 139 किलोमीटर दूर सुरू आहे. यातच अफगाणिस्तान अन् पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. एकप्रकारे पश्चिम आशियात युद्धाग्नीची धग लवकरच भारतापर्यंत, घरापर्यंत पोहोचणार आहे. या महायुद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol) किमती वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसा अर्थतज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. इराणकडे तब्बल 158 बिलियन बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. जरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण पूर्ण क्षमतेने निर्यात करू शकत नसला, तरी चीन आणि भारतासारख्या (India) देशांसाठी इराण हा महत्त्वाचा स्रोत आहे.

Petrol price in India 1
Gopichand Padalkar helicopter journey : ‘हेलिकाॅप्टरमध्ये बसलो की पोटात भीतीचा गोळा’, अजितदादांच्या विमान अपघातानंतर नेत्यांना हवाई प्रवासाची भीती; गोपीचंद पडळकरांनी सांगितला थरारक अनुभव

चीन दररोज 18 लाख बॅरल तेल इराणकडून घेतो. भारताचा विचार केला, तर आपल्या एकूण गरजेपैकी 40 टक्के कच्चे तेल आणि 50 टक्के एलएनजी खाडी इराण, सौदी अरब, युएई या देशांमधून येते. पण आता या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

Petrol price in India 1
Beed Mahadev Munde murder case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात स्फोटक ट्विस्ट? परळी हादरवणारी मोठी नावे समोर येणार; मनोज जरांगेंच्या सूचक विधानानं खळबळ (Video)

भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे 'होर्मुज जलडमरूमध्य'. हा एक अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे, ज्याला जागतिक तेलाची 'लाईफलाईन' म्हटले जाते. जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी 50 टक्के तेल याच मार्गाने येते. सौदी, इराक, कुवेत आणि कतारचे तेल देखील याच मार्गाने भारतात पोहोचते.

युद्धामुळे इराणने हा मार्ग बंद केला, तर भारतासह चीन आणि जपानला तेलाच्या महासंकटाचा सामना करावा लागेल. मालवाहतूक आणि विम्याचा खर्च वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल. युद्धाची तीव्रता वाढल्यास, आणि तेल पुरवठा खंडित झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 95 ते 110 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जातील. सध्या ब्रेंट क्रूड 73 डॉलरच्या आसपास असले तरी ते सात महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

भारतातील तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार जास्त काळ सोसू शकत नाहीत. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ अटळ आहे. जागतिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पेट्रोलचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु याबाबत अशी कोणतीही माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com