Strait of Hormuz crisis : अमेरिका आणि इराणमधील चर्चा फिस्कटल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावर पुन्हा वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्याबाबत सूचक विधान केले होते. इराणची कोंडी करण्यासाठी नव्या प्लॅनची घोषणा त्यांनी केली होती. पण या धमकीला न जुमानता इराणनेही आक्रमक पवित्रा घेत पहिल्यांदाच थेट पेट्रोलच्या किंमतींबाबत भाष्य करत जगाला धडकी भरविली आहे.
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळामध्ये सुमारे २१ तास चर्चा सुरू होती. पण काही मुद्द्यांवर सहमती न झाल्याने ही चर्चा फिस्कटली. त्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी रविवारी होर्मुझच्या नाकाबंदीची घोषणा केली. होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांना रोखण्यात येईल. इराणी बंदरांवर प्रवेश करणारी किंवा तिथून बाहेर पडणारी जहाजे सोडली जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जगासमोर पुन्हा ऊर्जा संकट उभे ठाकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणचे संसदीय अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलीबाफ यांनी सोशल मीडियात पोस्ट करत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी प्रामुख्याने अमेरिकी ग्राहकांना उद्देशून म्हटले आहे की, सध्याच्या पेट्रोल किमतींची मजा घ्या. या नाकाबंदीमुळे तुम्हाला लवकरच ४-५ डॉलरला मिळणाऱ्या पेट्रोलची आठवण येईल.
कलीबाफ यांच्या विधानामुळे आता पेट्रोलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगाला पुरवठा होणाऱ्या एकूण इंधनापैकी २० टक्के वाहतूक होते. अमेरिकेसह इराणनेही आक्रमक पवित्रा घेतल्यास ही वाहतूक ठप्प होऊन अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवटा निर्माण होऊन किंमती वाढू शकतात. त्याचा परिणाम महागाई वाढण्यावरही होईल.
जगासमोर हे मोठे संकट ठरेल. त्यामुळे कलीबाफ यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. इराणने आधीच होर्मुझ होणारी वाहतूक थांबविली आहे. भारतासह काही देशांच्या ठराविक जहाजांनाच परवानगी मिळत आहे. तणाव वाढल्यास ही स्थिती आणखी गंभीर बनेल. त्याचा फटका भारतालाही बसेल. गॅससह इतर इंधनाचा पुरवठ्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता भारतासह जगाची धास्ती वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.