

Maharashtra News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे भलेमोठे बॅनर अनेक ठिकाणी झळकले आहेत. विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो आणि शुभेच्छांचा मजकूर या बॅनरवर दिसत आहे. पण या सर्व बॅनर्समध्ये महाराष्ट्रातील एका बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त माजलगावमधील गौतम नगर भागातील लहान मुलांनी हा बॅनर तयार केला आहे. एका पांढऱ्या कागदावर डॉ. आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो लावले आहेत. तसेच या चिमुरड्यांनी आपले फोटोही या कागदावर चिटकवले आहे. त्यावर सात मुलांचे फोटो आहेत. या कागदावर हातानेच मजूकर लिहिला आहे.
‘भिमजन्मोत्स, १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...’ असे या कागदावर लिहिले आहे. चिमुरड्यांचा हा बॅनर सोशल मीडियात व्हायरल होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हेही या बॅनर पाहून भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियात या बॅनरचा फोटो पोस्ट करताना चिमुरड्यांच्या जिद्दीला जय भीम केला आहे.
आठवले यांनी म्हटले आहे की, गौतम नगर, माजलगाव मधील या चिमुरड्यांनी जो बॅनर बनवला आहे, तो केवळ एक कागद नाही, तर तो एका ज्वलंत विचारांचा पुरावा आहे. गरिबीत जन्माला येणारा प्रत्येक मूल, जो वंचितांच्या वेदना सोसतो, तो जन्मतःच एक 'रिपब्लिकन' असतो आणि मनात 'भीम सैनिक' असतो, हे या मुलांनी सिद्ध केलंय.
ज्यांच्या घरात सोन्याचा पाळणा नसतो, त्यांच्या काळजात बाबासाहेबांच्या विचारांचा निळा सूर्य असतो. चिमुरड्यांनी दाखवून दिलंय की, परिस्थिती जरी गरिबीची असली, तरी निष्ठा मात्र कोट्यधीशांपेक्षा मोठी आहे. तुमच्या या निखळ प्रेमाला आणि जिद्दीला माझा 'जय भीम'! असाच भीम विचारांचा वारसा पुढे चालवत राहा, अशी भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.