Ebrahim Raisi  Sarkarnama
देश

Iran President Ebrahim Raisi : मोठी बातमी : इराणच्या राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Rajanand More

Ebrahim Raisi Dead : इराणमध्ये हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Irans President Ebrahim Raisi) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अजरबैजाना प्रांताचे गव्हर्नर मालेक रहमती. धार्मिक नेता मोहम्मद अली आले-हाशेम हेही हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांचाही मृतांमध्ये समावेश असल्याने संपूर्ण इराणवर शोककळा पसरली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर रविवारी इराणधील उत्तर पश्चिमी प्रांतातील पूर्व अजरबैजानमधील डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यांच्या ताफ्यामध्ये रविवारी तीन हेलिकॉप्टर होते. दोन हेलिकॉप्टर परतली होती. त्यानंतर रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा शोध सुरू करण्यात आला होता. हा अपघात दाट जंगलात झाला असल्याने शोधमोहिम अडचणी येत होत्या. (Latest Marathi News)

अखेर पूर्ण अजरबैजान प्रांतातच डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crash) झाल्याचे स्पष्ट झाले. बर्फवृष्टीत ही शोधमोहिम सुरू होती. सोमवारी रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाले. त्यासाठी या टीमला तब्बल 17 तास लागले. अपघाताची स्थिती पाहिल्यानंतर हेलिकॉप्टरमधील एकही व्यक्ती बचावला नसेल, हे स्पष्ट असल्याचे टीममधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इराणी मीडियातील बातम्यांनुसार, हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले त्यावेळी हवामान खराब होते. त्यामुळे हेलिकॉप्टर अचानक उतरावे लागले असावे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यामुळे अपघात झाला असावा. दरम्यान, रईसी यांची 2021 मध्ये राष्ट्रपतीपती निवड झाली होती. त्यांनी जगातील शक्तीशाली देशांमध्ये इराणला अत्याधुनिक अण्वस्त्रांनी सज्ज करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तसेच सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरही सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली होती.

रईसी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले असून धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान नेहमीच आठवणीत राहील. दु:खाच्या या स्थितीत भारत इराणसोबत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT