An Iranian news anchor reporting live as Israeli missiles strike, capturing global attention and sparking online reactions.  sarkarnama
देश

Israel attack : VIDEO - इराणी सरकारी चॅनलवर बुलेटीन सांगत होती अँकर, अन् तितक्यात इस्रायलनं डागली क्षेपणास्त्रं!

Israel attack on Iran - या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, तुम्हीच बघा नेमकं काय घडलं?

Mayur Ratnaparkhe

Israeli Missile Attack Caught Live on Iranian TV - इराण-इस्रायलमधील संघर्ष आता चांगलाच भडकला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र डागली आहेत. यावेळी इस्रायली सैन्याने इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलेच्या इमरातीस लक्ष्य केले आहे. या ठिकाणी स्टुडिओत एक महिला अँकर बुलेटीन सांगत होती, तेवढ्यात जोरदार आवाज झाला आणि स्टुडिओ हादरला. अँकर बुलेटीन सोडून पळून गेली, सगळीकडे एकच गोंधळ उडला. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इस्रायलने हा क्षेपणास्त्र हल्ला इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या आवारातच केला. यावेळी महिला अँकर बुलेटीन सांगत होती. तेवढ्यात क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि संपूर्ण स्टुडिओ हादरू लागला.

सध्या या घटनेचा व्हिडओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे लक्षात येताच स्टुडिओमधील अन्य कर्मचारी आणि बुलेटीन देणारी अँकर सुरक्षितस्थळी पोहचण्यासाठी पळतच स्टुडिओच्या बाहेर पडले. याशिवाय, या व्हिडिओमध्ये आरडाओरड व अल्लाह हू अकबरचे नारे देखील ऐकू येतात.

दुसरीकडे इस्रायलने इराणच्या हल्ल्यांबद्दल म्हटले आहे की, संघर्ष अधिकाधिक तीव्र होत असताना, ते आपले ध्येय साध्य करण्यासाठी वेगाने पुढे जात आहेत. तर दोन्ही देशातील नागरिक मात्र जीव मूठीत धरून प्रत्येक क्षणी प्रचंड भीतीमध्ये जगताना दिसत आहेत.

इस्रायली हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इराणी लोक राजधानी तेहरान सोडत आहेत. परिणामी तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, लांब अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. लोक आता तेहरान सोडून आपल्या मूळ गावाकडे निघाली आहेत, जिथे ते सुरक्षित राहू शकतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT