Israel US Iran War Sarkarnama
देश

Iran War News: इराण हादरलं...! अमेरिकेने दिलेली धमकी खरी ठरली, घोषणा झाल्यानंतर 24 तासांतच 'सुप्रीम लीडर'वर मिसाईल हल्ला

US Iran War: अमेरिकेकडून इराणवर सोमवारी मध्यरात्री सर्वात मोठा हल्ला केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यात इराणच्या मिसाईल निर्मितीच्या कारखान्यांना लक्ष्य करत इराणला कमकुवत करणं हा अमेरिका आणि इस्त्रायला प्लॅन आहे.

Deepak Kulkarni

Iran News: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकदार होत चालला आहे. या देशांकडून एकमेकांवर मोठे हल्ले करण्यात येत आहेत. यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला. यानंतर इराणच्या सुप्रीम लीडरपदी मोजतबा खामेनेई यांची म्हणून निवड करण्यात आली. पण इराणनं आपली लढवय्या वृत्ती दाखवत अमेरिका आणि इस्त्रायलला अक्षरश: झुंजवलं आहे. अशातच अमेरिकेनं दिलेली धमकी खरी करुन दाखवतानाच इराणला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर 24 तासांच्या आतच अमेरिकेकडून त्यांच्यावर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. या अगोदर अमेरिका आणि इराणच्या संयुक्त कारवाईत सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत (ऑपरेशन एपिक फ्युरी/लायन्स रोअर) इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि सुमारे 48-50 वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. या हल्ल्यानंतर चवताळलेल्या इराणनं इस्रायल आणि अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मात्र, सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबा खामेनेई यांनी इराणची सूत्र हाती घेतल्याची माहिती समोर आली होती. या मोजतबा खामेनेई यांच्या निवडीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा पुढील सर्वोच्च नेता त्यांच्या संमतीशिवाय जास्त काळ टिकणार नाही असा धमकीवजा इशारा दिला होता.

हे विधान करत ट्रम्प यांनी थेट इराणलाच ललकारलं होतं. पण अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईनंतरही कडवी झुंज देत इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये या युद्धात पराभवाच्या स्विकारण्याच्या तयारीत नसल्याचं दिसून येत आहे. याचमुळे अमेरिकेसह इस्त्रायलही बिथरला आहे. याउलट इराणनं आपले हल्ले वाढवत अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. आता याचदरम्यान, अमेरिकेने इराणचे हल्ले कमी करण्यासा करण्यासाठी ट्रम्प हे अमेरिकेच्या सैन्याला इराणच्या भूमीत घुसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या सुरु असलेल्या युद्धात मोजतबा खामेनेई हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती इराण इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. यामुळे इराणमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वाेच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर काही तासांतच मोजतबा खामेनेई यांना अमेरिका आणि इस्त्रायलवर लक्ष्य केलं आहे. पण मोजतबा खामेनेई यांच्यावरील हल्ला नेमका कुठे केव्हा आणि कशा स्वरुपात झाला याचा अधिक तपशील उपलब्ध नसल्याचं इराण इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

अमेरिकेकडून इराणवर सोमवारी मध्यरात्री सर्वात मोठा हल्ला केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यात इराणच्या मिसाईल निर्मितीच्या कारखान्यांना लक्ष्य करत इराणला कमकुवत करणं हा अमेरिका आणि इस्त्रायला प्लॅन आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT