Kolhapur Sarpanch Death : कोल्हापुरात 'मस्साजोग'ची पुनरावृत्ती? जंगलात सापडले जळालेले अवशेष,'जेवायला जातो म्हणून गेले अन्...'; पाटगावच्या सरपंचांसोबत नेमकं घडलं काय?

Patgaon sarpanch death case in Kolhapur: कोल्हापूरमधील पाटगाव गावातील सरपंच जेवायला जातो असे सांगून घराबाहेर पडले आणि त्यानंतर जंगलात जळालेले अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Kolhapur Patgaon sarpanch incident details
Kolhapur Patgaon sarpanch incident detailsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur sarpanch death case: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. 11 जानेवारीला जंगलात पेटवलेले अवशेष पोलिसांना सापडले. मात्र सापडलेले अवशेष कोणाचे आहेत. याबाबत अद्याप तपास नाही. त्यामुळे पाटगावच्या सरपंचाचे नेमके काय झाले?

याबाबत कोणालाच कल्पना नाही. कोल्हापूर पोलिसांकडून तपास रखडलेला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे. त्यामुळे आपल्या वडिलांचं आणि पतीच्या तपासाचे काय झालं? याची रोजच विचारना मुलगा पारस पिळणकर आणि पत्नी तृप्ती पिळणकर यांच्याकडून होत आहे.

कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी की, भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे 7 जानेवारी 2026 रोजी मित्रांकडे जेवायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले आहेत. मात्र ते अद्याप घरी आलेले नाहीत.

कुटुंबियांशी कोणताच संपर्क न झाल्याने गारगोटी पोलिसात त्यांच्या बाबत तक्रार केली आहे. तर कुटुंबियांना 9 जानेवारी रोजी त्यांचे वाहन मिळून आले. तर 11 जानेवारी रोजी वाहनापासून काही अंतरावर जंगलात काही अवशेष जळालेल्या अवस्थेत मिळून आले.

Kolhapur Patgaon sarpanch incident details
LPG cylinder price hike : LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पण 'या' ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही; सरकार देणार 300 रुपयांचा दिलासा!

दरम्यान, हे अवशेष कशाचे आहेत? यासाठी पोलिसांकडून तपासणीसाठी ते ताब्यात घेतले. मात्र त्यालाही दोन महिने उलटले तरी अद्याप तो अहवाल प्राप्त झालेला नाही. शिवाय फॉरेन्सिक तपासणी करत असताना काही अवशेष शिल्लक ठेवणे आवश्यक असताना पोलिसांकडून कोणतेही अवशेष शिल्लक नाही असं सांगीतलं जात असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

ज्या दिवशी महेश पिळणकर हे बाहेर गेले. त्यादिवशी एका स्थानिक ट्रॅक्टर चालकाने महेश पिळणकर यांच्यामागे मास्क घातलेला इसम बसला होता. अशी माहिती पुढे आली. त्यामुळे याची चौकशी पोलिसांकडून झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान काही संघटनाच्या नेत्याकडून बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण कोल्हापूरात घडले की काय? अशी शंका व्यक्त केली आहे.

आज सरपंच महेश पिळणकर यांचा मुलगा पारस पिळणकर, पत्नी तृप्ती पिळणकर यंच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पोलीसप्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. या घटनेचा तपास एसआयटीकडे द्यावा. सात दिवसात तपासाची प्रगती जाहीर करावी. फॉरेन्सिक अहवाल उजेडात आणावा. यासह विविध मागण्या आज निवेदणाद्वारे केल्या आहेत.

Kolhapur Patgaon sarpanch incident details
सत्तासंघर्षातील 'रणरागिणी': महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या 5 'धुरंधर' महिला!

याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून दाखल आहे. पोलिसांचा सर्वोत्तपरी तपास सुरु आहे. पुढील तपास आम्ही करणार आहोत. काही दुसऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून एसआयटी मार्फत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही राजकीय संदर्भ या घटनेमागे आहे का? यांचा तपास देखील सुरु आहे. असा कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी याबाबत खुलासा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com