Trump orders attack on Iran after Apache helicopter downing Sarkarnama
देश

Iran US Conflict : कालपर्यंत इस्रायलला हल्ले करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांचाच इराणवर हल्ला; 'अपाचे' हेलिकॉप्टर पाडल्याने जग पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर?

America missile attack on Iran : इराणच्या वन-वे अटॅक ड्रोनने अमेरकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडलं आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन्ही अमेरिकेचे पायलट सुखरूप असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या हल्ल्याला वॉशिंग्टन चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Jagdish Patil

Iran retaliation after US airstrikes: इराण-इस्रायल यांच्यात जोरदार आणि अघोषित संघर्ष सुरू असतानाच आता या दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करणाऱ्या अमेरिकेनेच इराणवर हल्ले करायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

इराणने अमेरिकेचे अ‍पाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा करत अमेरिकेने हे हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांतील वाद चिघळून युद्धाला सुरूवात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अमेरीकन लष्कराने या कारवाईला इराणने केलेल्या विनाकारण हल्ल्याला दिलेलं प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या वन-वे अटॅक ड्रोनने अमेरकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडलं आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन्ही अमेरिकेचे पायलट सुखरूप असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या हल्ल्याला वॉशिंग्टन चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही कारवाई सुरू असतानाच, अमेरिकन सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती अनेक इराणी एअर डिफेन्स आणि रडार यंत्रणांवर हल्ले केल्याचं एका अमेरिकन अधिकाऱ्याने 'एक्सिओस'ला सांगितलं आहे. तर इराणकडून आम्ही अमेरिकन लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडले नसून होमुर्झ परिसरात सध्या परिस्थितीच निर्माण झाली आहे.

अमेरिकन हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे तर सध्याची या भागातील परिस्थिती जबाबदार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या घटनेनंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धोका कमी करण्यासाठी, अमेरिकेने हा परिसर सोडून जाणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

शिवाय इराणचे सशस्त्र दल कोणताही हल्ला अनुत्तरीत सोडणार नाही. तसंच परदेशी सैन्याने सुरक्षित राहायचे असेल तर हा परिसर सोडावा, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT