Meenakshi Natarajan : ना FIR, ना पोलीस तपास, ना शिक्षा..., तरीही काँग्रेसच्या मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद कसा झाला? लपवलेलं प्रकरण नेमकं काय आहे?

Meenakshi Natarajan nomination rejection controversy: नुकतंच काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आपल्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये मीनाक्षी नटराजन यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. मात्र, आता नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Congress leader Meenakshi Natarajan faces a major setback after her Rajya Sabha nomination was rejected in Madhya Pradesh
Congress leader Meenakshi Natarajan faces a major setback after her Rajya Sabha nomination was rejected in Madhya PradeshSarkarnama
Published on
Updated on

Meenakshi Natarajan Rajya Sabha Nomination Rejected: मध्य प्रदेशातून काँग्रेससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला आहे. हा काँग्रेससाठी सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

नुकतंच काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आपल्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये मीनाक्षी नटराजन यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. मात्र, आता नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर या संपूर्ण प्रकरणामागे हैदराबादमधील एक कायदेशीर वाद आणि निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आलेली माहिती असल्याचं समोर आलं आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. तक्रारदाराने थेट हैदराबाद येथील फोर्थ अॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात धाव घेत खासगी तक्रार दाखल केली होती. मुख्य तक्रारदार काँग्रेसच्या हैदराबादमधील माजी महिला नगरसेविका असून त्यांनी तेलंगणातील स्थानिक काँग्रेस नेत्यावर गैरवर्तन आणि विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत.

Congress leader Meenakshi Natarajan faces a major setback after her Rajya Sabha nomination was rejected in Madhya Pradesh
Balbharati Textbook Controversy : ‘बालभारती’तून महाराष्ट्राची लोकनृत्ये गायब; फक्त ‘दिंडी’चा उल्लेख, इतर राज्यांच्या नृत्यांना रंगीत चित्रांमध्ये स्थान

नटराजन या तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रभारी आहेत. त्यामुळे तक्रारदाराने त्यांनाही या प्रकरणात पक्षकार केले आहे. न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, नटराजन यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून मुख्य आरोपी शिवकुमार रेड्डी यांना संरक्षण दिलं आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदार महिलेने थेट न्यायालयात जाऊन खासगी तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार महिलेने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करत कलम 79 अंतर्गत, धमक्या दिल्याचा आरोप करत कलम 351 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आपली सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत त्यांनी मानहानीसंदर्भातील कलम 356 चाही समावेश तक्रारीत केला आहे.

Congress leader Meenakshi Natarajan faces a major setback after her Rajya Sabha nomination was rejected in Madhya Pradesh
Ishq Karo Party : मार्कंडेय काटजूंची ‘इश्क करो पार्टी’ वेधतेय लक्ष; 'TMC'च्या महुआ मोइत्रांना दिलं खुलं आमंत्रण!

मात्र, मीनाक्षी नटराजन यांच्यावर थेट विनयभंग, गैरवर्तन किंवा मानहानी केल्याचा आरोप नसून त्यांच्याविरोधात कलम 61, 45 आणि 46 अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. ज्यामध्ये त्या काँग्रेस प्रभारीसारख्या जबाबदार पदावर असूनही त्यांनी मुख्य आरोपी शिवकुमार रेड्डी यांना संरक्षण दिल्याचा आणि या कटात त्यांना साथ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com