Donald Trump signals 4-week conflict, global markets and flights impacted. Sarkarnama
देश

US Iran war : संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट! अमेरिका-इराण संघर्ष किती काळ चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं, "जोपर्यंत..."

Donald Trump statement on Iran Israel War : 'इराणमधील मोहीम ही जगाने आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि प्रचंड लष्करी कारवायांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तसंच सध्या लष्करी कारवाई पूर्ण ताकदीनिशी सुरू असून जोपर्यंत आमची सर्व उद्दीष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत ही सुरूच राहील.'

Jagdish Patil

US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे हे युद्ध आणखी पेटलं आहे. शिवाय अमेरिकेच्या कारवायांना इराणने देखील प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशांमधील युद्धाचा परिणाम शेअर मार्केटसह जगभरातील हवाई वाहतुकीवर झाला आहे.

त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार असा सवाल सर्वसामान्य लोकांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धा संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेलं युद्ध आणखी काही आठवडे सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ट्रम्प यांनी या युद्धाबाबत बोलताना, 'ही नेहमीच 4 आठवड्यांची प्रक्रिया राहिली आहे. आम्हाला अंदाज होता हे युद्ध चार आठवडे किंवा जास्त काळ चालेल. तर हा एक मोठा देश असल्यामुळे याला चार आठवडे किंवा त्याहून कमी कालावधी लागेल,' असं म्हटल्याचं वृत्त एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिली आहे.

शिवाय इराणी लोकांशी चर्चेसाठी आपण तयार आहोत. पण ती कधी होईल याबाबत मला माहिती नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर त्यांना चर्चा करायची आहे, पण मी त्यांना चर्चा मागील आठवड्यात करायला पाहिजे होती, या आठवड्यात नाही, असं सांगितल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध चार आठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जगावर आणखी काही आठवडे युद्धाचे सावट राहणार आहेत. एकीकडे अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येमुळे इराण आक्रमक झाला असून इराणणने मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत.

तर दुसरीकडे ट्रम्प यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून इराणमधील मोहीम ही जगाने आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि प्रचंड लष्करी कारवायांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तसंच सध्या लष्करी कारवाई पूर्ण ताकदीनिशी सुरू असून जोपर्यंत आमची सर्व उद्दीष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत ही सुरूच राहील असंही स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT