Pakistan Afghanistan war : इस्राईल-इराणमधील युद्ध पेटलं असतानाच पाकिस्तानच्या 4 लष्करी तळांवर मोठा हवाई हल्ला, अमेरिकेचं पूर्वीचं सैन्यतळही टार्गेट

Taliban Pakistan conflict : अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील तणाव वाढला असतानाच आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्ध सुरू झालं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन राष्ट्रांत देखील मोठा तणाव निर्माण झाला आहे.
Taliban Pakistan conflict
Taliban Pakistan conflictSarkarnama
Published on
Updated on

Taliban Pakistan Conflict : अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे आक्रमक झालेल्या इराणने अमेरिका आणि इस्त्रायलवर प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

इराणच्या या भूमिकेमुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा वणवा आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्ध सुरू झालं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन राष्ट्रांत देखील मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Taliban Pakistan conflict
PV Sindhu Dubai experience : डोक्यावरून क्षेपणास्त्रांचे आवाज, विमानतळाजवळ स्फोट; दुबईतील भीषण क्षणांचा बॅडमिंटनपटू सिंधूचा थरारक अनुभव!

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्षेत्रात केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून अफगाणिस्तानातील तालिबानी प्रशासनाने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, तालिबानी हवाई दलाने रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील 12 वी तुकडी, खैबर पख्तूनख्वा येथील मोहम्मद एजेन्सीसह घलानी येथील सैन्य तळांना टार्गेट केलं आहे.

या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर पाकिस्तानी सैन्याने काबुल, बगराम एअरबेसवर जे हवाई हल्ले केले होते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण ही कारवाई केल्याचं तालिबानने स्पष्ट केलंय.

Taliban Pakistan conflict
Akola Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; कारमधून बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला

दरम्यान, पाकिस्तानी विमानांनी बगराम हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हल्ला आम्ही परतवून लावल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बगराम हे अमेरिकेचा पूर्वीचा सैन्याचा तळ आहे.

तसंच पाकिस्तानने पुन्हा आमच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यास त्यांना अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही तालिबानने दिला आहे. त्यामुळे आधीच जगभरात युद्धाचं वातावरण असताना या दोन राष्ट्रांमधील संघर्षामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com