India’s Ministry of External Affairs urges restraint and diplomacy amid escalating US-Israel Iran war tensions and claims surrounding Ayatollah Khamenei. Sarkarnama
देश

Iran-USA War: युद्धाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं? ट्रम्प यांची मोठी घोषणा; चीन, फ्रान्स, कोरियासह भारतालाही युद्धात सहभागी होण्यासाठी चिथवलं

Iran-USA War: आता हार्मुझ सामुद्रधुनी टार्गेटवर तेल वाहतुकीचा फटका बसलेल्या देशांना युद्धात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे.

Amit Ujagare

Iran-USA War: इराण-अमेरिका युद्ध आता आणखी भीषण स्वरुप धारण करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन नुकतीच यासंदर्भत पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी अमेरिकेचा पुढचा प्लॅन सांगितला आहे. पण इराणनं आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून इतर देशांचा तेल पुरवठा रोखल्यानं ज्या देशांना फटका बसला आहे त्या देशांना या युद्धात सहभागी होण्याची चिथावणी ट्रम्प यांनी दिली आहे. तसंच हॉर्मुझच्या किनारपट्टीवर बॉम्ब हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ट्रम्प यांची पोस्ट काय?

ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "अनेक देश विशेषतः ज्यांना इराणने 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' (Hormuz Strait) बंद केल्याचा फटका बसला आहे. ते ही सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, अमेरिकेच्या सहयोगाने आपली युद्धनौका पाठवावी. आम्ही इराणची लष्करी क्षमता १०० टक्के नष्ट केली आहे. तरीही, ते कितीही दारुणपणे पराभूत झाले असले, तरीही या जलमार्गावर किंवा त्याच्या आसपास कुठेतरी एखादा-दुसरा ड्रोन पाठवणे, एखादा सुरुंग (mine) टाकणे किंवा कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागण्याचं काम करु शकतात. आम्हाला आशा आहे की चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आणि इतर देश ज्यांना या कृत्रिम अडथळ्याचा परिणाम भोगावा लागत आहे. त्या देशांनी या भागात आपली जहाजे पाठवतील. जेणेकरून, ज्या राष्ट्राची लष्करी ताकद पूर्णपणे मोडून काढली गेली आहे, अशा राष्ट्राकडून हॉर्मुझ सामुद्रधुनीला यापुढे कोणताही धोका उरणार नाही. दरम्यानच्या काळात, अमेरिका या किनारपट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला करेल आणि इराणच्या बोटी व जहाजे सतत लक्ष्य करून नष्ट करत राहील. कोणत्याही मार्गाने का होईना, आम्ही लवकरच हॉर्मुझ सामुद्रधुनी 'खुली', 'सुरक्षित' आणि 'मुक्त' करू!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प

दरम्यान, अमेरिकेकडून वारंवार इराणला आम्ही पूर्णतः उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं इराणकडून युद्ध संपवण्याची चिन्ह दिसत नाहीत. कारण सातत्यानं इराणकडून विविध देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडं इस्रायलकडून देखील इराणच्या अनेक रहिवासी ठिकाणं टार्गेट करण्यात आली आहेत, यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या तरी अमेरिका आणि इस्रायल हे एकत्रितपणे इराणविरोधात युद्ध लढत आहेत. अद्याप इतर कुठल्याही देशानं या दोन्ही बाजूंपैकी कोणाच्याही बाजूनं युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.

पण इराणनं ज्या देशानं अमेरिका आणि इस्रायलच्या अमानवी कृत्यांचा विरोध केलेला नाही त्या देशांचं तेल रोखण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या हार्मुझ सामुद्रधुनीतून जवळपास ९० टक्के तेल वाहतूक केली जाते ती वाहतूकच बंद केली आहे. त्यामुळं भारतात देखील सध्या तेल आणि गॅसचा अभुतपूर्व तुटवडा निर्माण झाल्याची स्थिती आहे. सरकारनं सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगितलं असलं तरी या युद्धाचा फायदा म्हणून कृत्रीम तुटवडा देखील निर्माण केला जात असल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT