

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धा मानली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कुस्ती महासंघांमधील वाद, विविध संघटना आणि स्पर्धांच्या नावावरून वादळ निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर हा नवीन कायदेशीर वाद महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात मोठी खळबळ उडवणारा ठरला आहे.
आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने (ISWAI) महाराष्ट्र कुस्ती महासंघाच्या विरोधात पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामुळे १८ मार्चपासून धामधुमीत पुण्यातील वाघोली इथं सुरू होणाऱ्या कुस्ती स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने त्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाला 'महाराष्ट्र केसरी' ही ऐतिहासिक आणि पारंपरिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी किंवा त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणतीही कायदेशीर अधिकार प्राप्त नाही. त्यामुळे या स्पर्धेच्या नावाचा आणि ब्रँडचा गैरवापर होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेत पुढे म्हंटले आहे की, नोंदणीकृत ट्रेडमार्क आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेस्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाने कुस्ती संघ यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
१९५८ पासून, ISWAI 'हिंद केसरी', 'भारत केसरी' आणि 'रुस्तम-ए-हिंद' यांसारख्या प्रतिष्ठित अजिंक्यपद स्पर्धांची आयोजक आणि या पदव्यांची 'ट्रेडमार्क धारक' संस्था आहे. या पदव्यांनी पैलवानांच्या अनेक पिढ्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि सन्मान मिळवून दिला आहे. या पदव्यांची अस्मिता आणि प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असे संघटनेचे म्हणणं आहे. पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. या सुनावणीनंतर स्पर्धा सुरू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. न्यायालयाच्या निर्णयाने स्पर्धेच्या आयोजनावर आणि कुस्तीपटूंच्या सहभागावर मोठा परिणाम होऊ शकतो. 16 तारखेला होणाऱ्या कोर्टाच्या सुनावडीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.