Aftermath of Israeli airstrikes on suspected nuclear sites in Iran; rising tensions threaten regional stability.  sarkarnama
देश

Israel Attack Iran : मोठी बातमी! इस्त्राइलचा इराणवर हल्ला, आण्विक तळ केले टार्गेट; लष्कर प्रमुखाचा मृत्यू?

Operation Rising Line Benjamin Netanyahu : इस्त्राइलच्या वायुसेनेने इराणची राजधानी तेहरानमध्ये एअर स्ट्राईक केले. नेमके कुठल्या जागांना टार्गेट करण्यात आले हे स्पष्ट नाही.

Roshan More

Israel Attack Iran News : इस्त्रायलने इराणवर भीषण केला आहे. इस्त्रायलच्या वायुदलाने इराणच्या आण्वीक तळांना टार्गेट केले. या हल्ल्याची पुष्टी इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी केली आहे. या हल्ल्यात इराणाचे लष्करीप्रमुख मोहम्मद बघेरी आणि एक अणुशास्त्रज्ञ मारला गेल्याचा दावा इस्त्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे.

इराण देखील प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत असून इस्त्रायलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायलने आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डानांसाठी बंद ठेवले आहेत. जोरसलेम आणि इतर शहरांमध्ये सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश इस्त्राइल सरकारने दिले आहेत.

इस्त्राइलच्या वायुसेनेने इराणची राजधानी तेहरानमध्ये एअर स्ट्राईक केले. नेमके कुठल्या जागांना टार्गेट करण्यात आले हे स्पष्ट नाही. या हल्ल्यामागे अमेरिकाचा हात नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राइल इराणवर हल्ला करेल, अशी शंका व्यक्त केली होती.

ऑपरेशन 'रायझिंग लायन'

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इस्रायलने ऑपरेशन 'रायझिंग लायन' सुरू केले. हे ऑपरेशन इस्रायलच्या अस्तित्वासाठी इराणाच्या धोक्याला मागे टाकण्यासाठी एक लक्ष्यित लष्करी कारवाई होती. हा धोका दूर करण्यासाठी जितके दिवस लागतील तितके दिवस ही कारवाई सुरू राहील. इराणने अण्वस्त्रे बनवण्याच्या दिशने अतिशय धोकादायके पावले उचलली होती म्हणून हा हल्ला करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT