
AIMIM VBA alliance breakup : महाराष्ट्रात 2018मध्ये तिसरा पर्याय म्हणून, वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) समोर आली होती. या युतीचा 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर देखील परिणाम झाला.
या युतीने चांगली मतं घेतली. परंतु या लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर 2019 मध्ये ही युती तुटली. ही युती लोकांच्या पसंतीला पडली असतानाच, का तुटली? यावर बोलताना, पहिले 'दूध जलाया किसने?' असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे.
औरंगाबादचे (छत्रपती संभाजीनगर) 'AIMIM' माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलताना, वंचित बहुजन आघाडीबरोबर महाराष्ट्रात झालेली युती आणि लोकसभा 2019नंतर लगेच तुटली, यावर भाष्य केले. ही युती तुटल्याचे सांगताना, प्रकाश आंबेडकरांनी 'दूध का जला छाछ भी, फूंक फूंक कर पीता है', या वाक्यप्रचाराचा दिलेल्या संदर्भाला इम्तियाज जलील यांनी 'दूध जलाया किसने?' हा प्रतिप्रश्न केला आहे.
महाराष्ट्रात वंचितबरोबर झालेल्या युतीचा प्रयोग का थांबला, हा प्रयोग बहुजनांना आवडला होता, यावर इम्तियाज जलील यांनी याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण पहिल्यादा एकत्रित निवडणुकीत जाताना, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं होतं की, एका निवडणुकीत आपण दुनिया नाही बदलू शकत. सुरुवातीला कमी जागा लढवू. त्यावर फोकस करू. काही जागा निवडून आल्यानंतर लोकांना देखील विश्वास बसेल. पुढच्या निवडणुकीची तयारी करू. लोक जोडले जातील. पण तसे झाले नाही.
प्रकाश आंबेडकर यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. सगळ्या वंचितांना एकसाथ न्याय द्यायची, त्यांची भूमिका होती. तो न्याय द्यायच्या नादात, आम्ही 'ना घर रहे, ना घाट रहे'. प्रकाश आंबेडकरांनी ही युती तुटतांना, 'दूध का जला छाछ भी फूंक फूंक कर पीता है', असे म्हटले होते. इम्तियाज जलील यांनी त्यालाच जोडून दूध जलाया किसने? असा प्रश्न करताच, छाछ बाद मै बनी है, याकडे लक्ष वेधले. परंतु दूध जलाय किसने? याचे उत्तर मिळाले पाहिजे. आम्ही तर दूध जाळलं नाही, असंही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडीबरोबर 'AIMIM'ची युतीनंतर मुस्लिम राजकारणाच्या सीमा ओलांडण्याचा एक मार्ग असदुद्दीन ओवैसींना सापडला होता. या युतीनिमित्ताने 'AIMIM'ने महाराष्ट्रातील दलित मतदारांना आकर्षित केले होते. या युतीपूर्वी 'AIMIM' ने 2014च्या महाराष्ट्र निवडणुकीत, एक नवीन घोषणा वापरून पाहिली, 'जय भीम, जय मीम', दलित नायक भीमराव आंबेडकरांसाठी 'भीम' आणि 'AIMIM'साठी 'मीम', असा या घोषणेचा अर्थ होता. यानंतर 2018मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित आणि 'AIMIM'ची युती झाली.
राज्यात महायुती आणि त्यांच्या सरकारकडे कसं बघता, यावर बोलताना 'AIMIM'चे इम्तियाज जलील म्हणाले, "राजकीय स्वार्थासाठी, वैचारिकता बाजूला ठेवून सर्वांनी सत्तेसाठी 'कॉम्प्रोमाइज' केले आहे. भाजपचे कट्टर विरोधक कोण? तर अजित पवार! ते त्याच्यासोबत गेले. अजित पवार यांचे कट्टर विरोधक कोण? तर शिवसेना! राजकारणात कोणी कोणाचा जास्तवेळी शत्रू नसतो आणि मित्रही होऊ शकत नाही, याचे हे उत्तर उदाहरण आहे".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.