Israel-Palestine War  Sarkarnama
देश

Israel-Palestine War : इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा खिशाला बसणार चाट; कच्चा तेलाचे दर भडकण्याची शक्यता

Israel War Oil Price : येत्या काळात आशियाई देशात कच्चा तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे.

Vijaykumar Dudhale

Israel War Impact on India : पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे इस्राईल देश हादरून गेला आहे. या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होण्यास सुरुवात झाली आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होत असून, येत्या काळात आशियाई देशात कच्चा तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे. (Israel-Palestine war will lick your pocket; Crude oil prices are likely to rise)

या युद्धामुळे कच्चा तेलाचे दर वाढत आहेत. बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती प्रतिबॅरल चार डॉलरपेक्षा अधिकने वाढल्या आहेत. दोन देशांतील लष्करी संघर्षामुळे मध्य पूर्वेतील काही देशांत राजकीय निश्चितता अधिक वाढली आहे. याचा परिणाम आशिया बाजारातील तेलावर झाला आहे. तेलाच्या किमती वाढविल्यामुळे गेल्या आठवड्यापासून स्वस्त झालेले तेल पुन्हा वधारणार आहे.

गेल्या आठवड्यात या तेलाच्या दरात मार्चनंतर पहिल्यांदाच मोठी घसरण झाली आहे. ज्यामध्ये अकरा टक्क्याने तेल घसरले आहे. शनिवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे इस्राईल आणि गाझामधील सुमारे एक हजार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या दोन्ही देशांदरम्यानचा संघर्ष पेटलेला असतानाच याचा परिणाम आता तेल बाजारावर झालेला आहे. त्यामुळे तेलाचे दर येत्या काळात कडाडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

दरम्यान, या दोन्ही देशांतील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही झालेला आहे. पितृपक्षामुळे भारतात सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाले होते. गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर घसरत असताना शनिवारी पुन्हा एकदा सोने -चांदीचे दर उसळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून घसरत गेलेले सोने-चांदीचे भाव पुन्हा एकदा वधारले आहेत. शनिवारी चांदीच्या भावात १६०० रुपयांनी, तर सोन्याचे भाव ३०० रुपयांनी वधारले आहेत. गेल्या आठवडाभरात सोनं १४०० रुपयांनी, तर चांदी ४१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

इस्राईलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाच्या भीतीने सोन्या-चांदीचे दर अचानक वाढले आहेत. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होतो. त्यामुळे येत्या काळात इस्राईल व पॅलेस्टाईन या दोन्ही देशांदरम्यानचे संबंध ताणले गेल्यास याचा परिणाम अनेक बाबींवर होणार आहे. त्यात पहिला फटका सोने-चांदी आणि त्यानंतर कच्चा तेलाच्या किमतीला बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT